लोणंद : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवार, २१ जानेवारी रोजी झालेल्या कांदा बाजारात गरवा कांदा ३८०० व हळवा कांद्याची ५०५ पिशव्यांची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. गरवा कांदा ३२०० रुपये तर हळवा कांदा २९०० रुपयांपर्यंत दर निघाले असल्याची माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.
गरवा कांदा नंबर एक २५०० ते ३२६० रुपये, हळवा कांदा नंबर एक २००० ते २९०० रुपये, गरवा कांदा नं. दोन १५०० ते २५०० रुपये, हळवा कांदा नंबर दोन १४०० ते २०००, गरवा कांदा गोल्टी ८०० ते १४०० रुपये, हळवा गोल्टी ९०० ते १५०० रुपये दर निघाले. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चांगला वाळवून व निवडून लोणंद बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.
जनावरे बाजारात गाय ५४ हजार ते ६० हजार, शेळ्या ४२०० ते १६ हजार, मेंढ्या ६ हजार ते १७ हजार, बोकड ५ हजार ते २५ हजार रुपये दराने विक्री सुरू होती.