बामणोली परिसरात गारठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:24+5:302021-01-08T06:05:24+5:30

ऊबदार कपड्यांना मागणी वाढली सातारा : सातारा शहरासह परिसरात थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षणासाठी नागरिक ऊबदार ...

Gartha increased in Bamnoli area | बामणोली परिसरात गारठा वाढला

बामणोली परिसरात गारठा वाढला

ऊबदार कपड्यांना मागणी वाढली

सातारा : सातारा शहरासह परिसरात थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षणासाठी नागरिक ऊबदार कपडे खरेदी करीत आहेत. परिणामी दुकानांत गर्दी होताना दिसून येत आहे. स्वेटर, मफलरबरोबरच ब्लँकेटना मागणी वाढली आहे, तर थंडीमुळे दरातही किरकोळ वाढ झालेली आहे.

दहीवडी शहरात

जनावरांचा त्रास

दहीवडी : शहरात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून, अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा नाहक त्रास होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

कुत्र्यांकडून दुचाकी सीटचे नुकसान

सातारा : सातारा शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. हे कुत्रे आता रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या सीट फाडत आहेत. दुचाकीधारकांना यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. संबंधित विभागाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

धोकादायक झाडे हटविण्याची मागणी

सातारा : सातारा-फलटण मार्गावरील अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांची दिशा वाऱ्यामुळे बदलली आहे. त्यामुळे नवीन वाहनचालकांची फसगत होत असते. या रस्त्यावरील दिशादर्शक फलकांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच ज्या ठिकाणी धोका आहे, त्याठिकाणी फलक लावावा.

Web Title: Gartha increased in Bamnoli area