शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर अलिशान कार अन् सात तोळे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:14 IST

आत्तापर्यंत जुगार अड्ड्यावर पोलिसांना जुगाराचे साहित्य आणि पैसे सापडत होते. मात्र, पानमळेवाडी, ता. सातारा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांना अलिशान कार आणि तब्बल सात तोळ्यांचे दागिने सापडले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देजुगार अड्ड्यावर अलिशान कार अन् सात तोळे सोने१७ लाखांचा ऐवज जप्त : तिघांना अटक

सातारा : आत्तापर्यंत जुगार अड्ड्यावर पोलिसांना जुगाराचे साहित्य आणि पैसे सापडत होते. मात्र, पानमळेवाडी, ता. सातारा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांना अलिशान कार आणि तब्बल सात तोळ्यांचे दागिने सापडले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.कादर बशीर पठाण (वय ३३) इम्रान बशीर पठाण (वय ३४), मोहसीन बशीर पठाण (वय २५, रा. पानमळेवाडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पानमळेवाडीतील एका दुमजली इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता पोलीस आवाक झाले. सोन्याची सात तोळ्याची चेन, एक चांदीचे ब्रेसलेट, एलईडी टीव्ही, स्पीकर, पॉवरबँक, तीन महागडे मोबाईल असा ऐवज जुगार अड्ड्यावर सापडला. तर एक अलिशान कार इमारतीखाली पार्क केलेली आढळून आली. ही कारही पोलिसांनी जप्त केली.

या जुगार अड्ड्यावर तब्बल १७ लाख ३३ हजार ४२२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाईची बहुदा ही पहिलीच घटना आहे.ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार यादव, मोहन पवार, प्रमोद भिसे, मंगेश डोंबे, प्रतिभा करपे, दादा बनकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर