शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

आगाशिवनगर भाजी मंडईत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:37 IST

मलकापूर : मलकापूर पालिकेने गर्दी होऊ नये म्हणून भाजी मंडईची चार ठिकाणे निश्चित केली. ठरवून दिलेल्या जागेतच नियमांचे ...

मलकापूर : मलकापूर पालिकेने गर्दी होऊ नये म्हणून भाजी मंडईची चार ठिकाणे निश्चित केली. ठरवून दिलेल्या जागेतच नियमांचे पालन करून बसा, अन्यथा कारवाई, असा कडक इशाराही पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र भाजी मंडईत प्रमाणापेक्षा जास्त विक्रेते बसत असून ग्राहकांचीही झुंबड उडत असल्यामुळे कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर दोन तासात जणू जत्राच भरत आहे.

या जत्रेत विक्रेत्यांसह ग्राहक गळ्यात मास्क अडकवून गर्दी करतात. सोशल डिस्टन्सिंगसह नियमांचा फज्जा उडत आहे.

कोरोनाकाळात मलकापुरातील भाजी मंडई हा विषय कायमच वादाचा विषय बनला होता. कायम रस्त्यांवर व खासगी जागेतच मंडई भरत होती. त्यामुळे गर्दी होत होती. ही बाब विचारात घेऊन नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, तत्कालीन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह नगरसेवकांनी हा विषय कायमस्वरूपी मिटविण्यासाठी प्रयत्न केले.

आरक्षित जागेतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यानावाने नवीन भाजी मंडई सुरू केली. मात्र आगाशिवनगर व जखिणवाडी रस्त्यांवरच भाजी मंडई भरत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शहरात चार ठिकाणी मंडई भरवण्याचे ठरवले. याची अंमलबजावणीही त्यांनी तातडीने केली. मात्र त्या चार जागांवर गर्दी होणार नाही अशी विक्रेत्यांना बसण्याची सोय केली. तरीही नियम धाब्यावर बसवून कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या फूटपाथवर १०५ विक्रेत्यांना परवानगी असताना, सध्या दीडशेहून अधिक विक्रेते गर्दी करत आहेत.

तसेच सकाळी दोन तासात ग्राहकही नाक-तोंड मोकळंच ठेवत मास्क गळ्याला अडकवून खरेदीसाठी गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सिगसह कठोर निर्बंधाला केराची टोपलीच दाखवत आहेत.

चौकट

३२० विक्रेत्यांची सोय

नवीन भाजी मंडई ८५ विक्रेते

जुनी शिंगण यांच्या जागेत ७५ विक्रेते

कृष्णा रुग्णालय उत्तरेकडील भिंतीलगत १०५ विक्रेते

अरुण जाधव यांच्या जागेत ५५ विक्रेते

चौकट

लॉकडाऊनमुळे व्यवसायात बदल

लॉकडाऊन केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय बंद केले आहेत. अशा बंद व्यवसायातील कामगार उत्पन्नाचे साधन म्हणून जीवनावश्यक वस्तू विक्रीकडे वळले आहेत. त्यामुळे खरेदीदारांपेक्षा विक्रेत्यांचीच संख्या जास्त दिसत आहे.

चौकट

बाहेरील विक्रेत्यांची मुजोरी

स्थानिक व्यावसायिक लाखो रुपये भांडवल गुंतवून हजारो रुपये भाडे देऊन नियम पाळत वेळेत शटरडाऊन करतात. तर मलकापूरच्या बाहेरून येऊन बिनभाड्याच्या जागेत अनधिकृत व्यवसाय करणारेच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

फोटो माणिक डोंगरे यांनी मेल केला आहे.

आगाशिवनगर येथी भाजी मंडईत विक्रेत्यांसह ग्राहक गळ्यात मास्क अडकवून गर्दी करत आहेत. (छाया : माणिक डोंगरे)