शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा दहा टक्क्यांचा फंडा, सोळा लाखांचा घातला गंडा; साताऱ्यात कंपनी मालकावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:39 IST

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष

सातारा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आर. के. ट्रेडिंग कॅपिटल’चा मालक रोहित विनोद काठाळे (वय ३५, मंगळवार पेठ, सातारा) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत कुणाल सुभाष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पवार हे २०२३ मध्ये काठाळे यांच्या राजवाडा परिसरातील कार्यालयात गेले होते. त्यावेळी काठाळे याने फॉरेक्स व इंडियन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून पवार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये ऑनलाईन व एनईएफटीद्वारे १६ लाख रुपये गुंतविले. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही. पवार यांनी वेळोवेळी परताव्याची मागणी केली असता संशयिताने टाळाटाळ केली. संशयित फसवत असल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली परंतु आरोपीने रक्कमदेखील परत दिली नाही. त्यानंतर सप्टेंबर २०२५ पासून संशयिताचा मोबाईल फोन बंद असून तो पत्त्यावर राहत नसल्याचेही समजले. यानंतर पवार यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्यासारख्या अनेक नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचेही पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

संशयिताचा मोबाईल बंदसंशयित काठाळे याचा मोबाईल २७ सप्टेंबरपासून बंद आहे. त्याच्याकडून कितीजणांची फसवणूक झाली, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Investment scam of ₹16 lakh; Company owner booked.

Web Summary : R. K. Trading Capital owner booked for allegedly defrauding a man of ₹16 lakh with promises of high investment returns. The suspect is now absconding; police are investigating further complaints.