पालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या उपस्थितीत मशीनची चाचणी झाली. यापूर्वीच्या मशीनपेक्षा नवीन मशीन प्रभावी असल्याचे विजय वाटेगावकर यांनी सांगितले. शहरात पावसाळ्यामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालिका सतर्क आहे. विविध भागात औषध फवारणी, धूरफवारणी करण्यात येत आहे. आशा सेविका आणि मुकादम यांच्या वतीने सर्व्हे करण्यात येत आहे. पालिकेकडे धूरफवारणीसाठी चार मशीन होत्या. त्याचा वापर करण्यात येत होता. मात्र अलीकडे पालिकेने आधुनिक पद्धतीच्या दोन मशीन खरेदी केल्या आहेत. या मशीनमध्ये पाण्याची टाकी समाविष्ट असून, धुराबरोबरच बाष्पनिर्मिती होते. त्यामुळे धूर जमिनीबरोबर जास्त वेळ राहतो. परिणामी डासांचे निर्मूलन करण्यासाठी नवीन मशीन अधिक प्रभावीपणे काम करीत आहे. या नवीन मशीनची चाचणी विजय वाटेगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. नवीन मशीनची किंमत प्रत्येकी ३२ हजार रुपये असून, एकूण सहा मशीन पालिकेकडे झाल्या आहेत.
आधुनिक फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST