शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 15:09 IST

Udayanraje Bhosale SataraNews- काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सर्व सातारकरांना लागली असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फीत कापून उद्घाटन केले. त्याचबरोबर सातारकरांसाठी सेपरेटर सुरू झाला असून वचनपूर्ती पूर्ण केली आहे. याचे सर्व श्रेय साताकरांना आहे, असेही उदयनराजेंनी यावेळी बोलून दाखविले.

ठळक मुद्दे ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन सर्व श्रेय सातारकरांना; नागरिकांसाठी खुला

सातारा : काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सर्व सातारकरांना लागली असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फीत कापून उद्घाटन केले. त्याचबरोबर सातारकरांसाठी सेपरेटर सुरू झाला असून वचनपूर्ती पूर्ण केली आहे. याचे सर्व श्रेय साताकरांना आहे, असेही उदयनराजेंनी यावेळी बोलून दाखविले.वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सेपरेटरच्या उद्घाटनाचीच प्रतीक्षा होती. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याला मुहुर्त मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फित कापून ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी ग्रेड सेपरेटरमधून वाहनातून प्रवासही केला.

यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, किशोर शिंदे, राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, निशांत पाटील, मिलिंद काकडे, स्नेहा नलवडे, सविता फाळके, सीता हादगे यांच्यासह इतर नगरसेवक व सातारकर नागरिक उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर महत्वूपर्ण होता. यामुळे वाहतुकीची कोंडी टळणार आहे. हा ग्रेड सेपरेटर पूर्ण झाल्याने सातारा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेले वचन पूर्ण झालेले आहे. या सेपरेटरचे उद्घाटन झाले असून तो सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर करतो. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात नगरसेवकापासून झाली. पुढे आमदार, मंत्री आणि खासदारही झालो. यासाठी सातारकरांनी नेहमीच मला सहकार्य केले, असेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.७५ कोटी रुपये खर्च...सातारा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या पावणे तीन वर्षांपासून यंत्रणा कामाली होती. सुरुवातीला ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर