शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

इंधन स्वस्त; रिक्षा भाडे जास्त

By admin | Updated: December 2, 2014 00:26 IST

चर्चेला उधाण : भाडेवाढ कमी होण्याची प्रतीक्षा

सातारा : ‘अच्छे दिन’ येणार, असे म्हणत सत्तेत आलेल्या भाजपाच्या सरकारने गेल्या काही दिवसांत सामान्यांना आधार देत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचा आनंद सामान्यांना अधिक झाला आहे. आता रिक्षा भाडेवाढही कमी होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.गेल्या सहा महिन्यांत पेट्रोल डिझेल दर आठ-दहा रुपयांनी कमी झाले आहेत. यापूर्वी जेव्हा कधी इंधनात वाढ झाली की रिक्षा संघटना भाडेवाढीसाठी सरसवायची. रिक्षाचालकांना ही वाढ देण्यासाठी प्रसंगी आंदोलनेही झाली. या गोष्टी लक्षात घेता आता इंधनाचे दर कमी झाल्यामुळे रिक्षा भाडे कमी होणार का? आणि किती रुपयांनी याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. सातारा शहरातून शाहूपुरी, पोवई नाका, एस. टी. स्टॅण्ड येथे ‘शेअर रिक्षा’ आहेत. त्याबरोबरच नाक्यावरून संगमनगर, शिवराज पेट्रोल पंप, आकाशवाणी या परिसरात रिक्षा जातात. या शेअर रिक्षाचे दर बसच्या दराच्या दुप्पट आहेत. वेळेत बस मिळत नसल्यामुळे अनेक प्रवासी या रिक्षांतून प्रवास करतात. मधल्या काही काळात इंधन दरवाढीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ झाल्याचे चित्र दिसते. सध्या राजवाडा-शाहूपुरी दहा रुपये, राजवाडा-स्टॅण्ड दहा रुपये, राजवाडा-संगमनगर बारा रुपये, पोवई नाका- शिवराज पंप दहा रुपये, असे शेअर रिक्षाचे दर आहेत. (प्रतिनिधी)रिक्षा केवळ इंधनावर चालत नाही. त्याला स्पेअर पार्ट आणि अन्य गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे इंधनाच्या किमतीत कपात झाली की भाडेवाढ कमी होणे शक्य नाही. रिक्षाचालकही सामान्य माणूस आहे. तोही परिस्थितीशी झगडत आयुष्य जगत आहे, याची जाणीव सर्वांनाच असावी.- विष्णू जांभळे, अध्यक्ष, अजिंक्य रिक्षा संघटनावास्तविक रिक्षाचालकांनाही मोठ्या प्रमाणावर स्पर्धेला सामोरे जावे लागते आहे. घरोघरी वाढणाऱ्या दुचाकी-चारचाकी, यामुळे रिक्षा व्यावसायिकांचा धंदा मंदावला आहे. त्यातच वाहन परवाना, वाहन विमा यासह अनेक गोष्टींसाठी त्यांना खर्च असतो. सर्वत्र महागाईचा भस्मासूर वाढताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार के ला तर अन्य कोणताही व्यवसाय शक्य नाही म्हणून ते रिक्षा व्यवसायात उतरल्याचे लक्षात येते.