शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

‘वीजवितरण’च्या कारभारावरून संतापाची ठिणगी

By admin | Updated: January 5, 2016 00:40 IST

कऱ्हाडात सदस्य आक्रमक : अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; वेळ घालवण्यापेक्षा कामे करण्याच्या सूचना

कऱ्हाड : कऱ्हाड पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य तालुक्यातील जनतेच्या विजेबाबतच्या तक्रारी वेळोवेळी मांडत असतात. परंतु त्याची वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून जनतेच्या वीज वितरणबाबतच्या बहुतेक तक्रारी सोडवण्यात आलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांकडून नुसती कोरडी आश्वासनेच दिली जातात. त्यामुळे आम्ही काय नुसत्या समस्याच मांडायच्या काय ? त्याची कार्यवाही अधिकारी कधी करणार, अशा शब्दात वीजवितरणच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांनी ताशेरे ओढले. येथील यशवंतराव चव्हाण बचत भवन येथे सभा पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. वीजवितरण कंपनीच्या आढाव्यावेळी सर्वच पंचायत समिती सदस्य व उपस्थित अधिकाऱ्यांच्यांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी तालुक्यातील गावांमध्ये वीज कनेक्शन देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून केली जाणारी टाळाटाळ, आटके परिसरात सिंंगल फेज योजनेची प्रलंबित असलेली कामे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील विजेचा खांबांची दुरवस्था अशा वीजवितरण कंपनीकडून प्रलंबित असलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांवर सभेदरम्यान सदस्यांनी आगपाखड केली.याप्रश्नांबाबत प्रत्येक मासिक सभेमध्ये चर्चा होऊनही अधिकाऱ्यांकडून यावर मार्ग काढला जात नसल्याने वीजकंपनीच्या कामाबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी कोळेवाडी येथील शेतकऱ्याला गेल्या दीड वर्षापासून वारंवार मागणी करूनही वीज कनेक्शन मिळालेले नाही. वीजकंपनीचे अधिकारी केवळ आश्वासनेच देत असतात. त्यांची प्रत्यक्ष कृती मात्र शून्य असते, अशी टीका लक्ष्मण जाधव यांनी केली. विंंग परिसरात गेल्या दोन वर्षांपासून नवीन शेती पंपांना वीज कनेक्शन देण्यात आली नाहीत. वारंवार मागणी करूनही त्याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी विजेच्या खांबासाठी पैसे भरण्यास तयार असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. अपार्टमेंटसाठी तातडीने वीज कनेक्शन दिली जातात शेतकऱ्यांच्या ङ्कमागणीकडे मात्र, दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप शिरवाडकर यांनी केला. अनिता निकम यांंनी विजेच्या उच्च दाबामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली असून, त्यासाठी वीजकंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी ङ्कमागणी केली. भाऊसाहेब चव्हाण यांनी राज्य सरकारच्या निर्णयानुसार टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावांमधील जनतेला सवलतीचे वीज दर त्वरित लागू करण्यात यावेत. चोरून वीज वापरणाऱ्यांंवर वीजकंपनी कारवाई करणार नसेल, तर शेतकऱ्यांनीही त्याच प्रकारे वीज चोरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये अशी टीका चव्हाण यांंनी केली. ग्रामपंचायत विभागाच्या कामाकाजाचा आढावा सादर केला जात असताना अनिता निकमङ्क यांंनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसेवक आपल्या कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची दैनंदिन कामे खोळंबून राहत असल्याचे सांगितले. रूपाली यादव यांनी शासनाच्या निर्णयामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुली बंद करण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतींना दैनंदिन खर्च करणे कठीण होत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतनही मिळालेले नाही. लक्ष्मण जाधव यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांना मानधन देण्याची मागणी केली.यावेळी पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शालेय पोषण आहार, एसटी प्रशासन तसेच उपजिल्हा रुग्णालय या विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला. (प्रतिनिधी) सदस्यांनी काय फक्त समस्यांच मांडायच्या काय.. मासिक सभेवेळी सदस्यांकडून भागातील कामांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या जात असतात. याचे अधिकाऱ्यांना गांभीर्यच वाटत नाही. तसेच त्यांच्याकडून सदस्यांची मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे सदस्यांनी नुसत्या समस्याच मांडायच्या काय. असे सदस्या रूपाली यादव यांनी सभागृहात सभेदरम्यान सांगितले.