शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

मदन भोसलेंच्या घरासमोर ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

By admin | Updated: July 20, 2014 23:19 IST

खर्डा-भाकरी आंदोलन : दुसरा हप्ता पाचशे रुपये देण्याची मागणी

सातारा : वाई तालुक्यातील भुर्इंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यात या गळित हंगामात गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन पाचशे रुपये मिळावा, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले.आंदोलकांनी येथे खर्डा-भाकरी खाऊन कारखाना व्यवस्थपनाचा निषेध केला. दरम्यान, ठिय्या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांशी मदन भोसले यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर संचालक मंडळाची बैठक घेऊन दराबाबत तोडगा काढण्याची ग्वाही दिली. ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन पाचशे रुपये मिळावा, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना अध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी माजी आमदार मदन भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखाना व्यवस्थानास तोंडी अथवा लेखी म्हणणे देऊनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. किसन वीर कारखान्याइतके सह-प्रकल्प अन्य कोणत्याही कारखान्याकडे नाहीत. या प्रकल्पातून कारखान्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळत आहे. असे असतानादेखील सभासदांना त्यांचा मोबदला मिळत नाही.दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच आंदोलकांनी निवासस्थानाच्या बाहेर चटणी, खर्डा-भाकर ठेवली आणि जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर येथे अध्यक्ष मदन भोसले आले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर दुसऱ्या हप्त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची ग्वाही मदन भोसले यांनी दिली. मात्र, आंदोलकांनी त्यांना दि. ३0 जुलैची अंतिम मुदत दिली. या तारखेच्या आत जर रक्कम जमा नाही झाली तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष अर्जून साळुंखे, संजय भगत, राज्य प्रवक्ते दिलीप तुपे, राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव कदम, जिल्हा सरचिटणीस अल्लाउद्दीन इनामदार, सातारा तालुकाध्यक्ष संजय साबळे, खटाव तालुकाध्यक्ष सुर्यकांत साबळे, जीवन शिर्के, दीपक चव्हाण, दत्तात्रय सुतार, प्रकाश साबळे, रजनीकांत साबळे, अमोल शिंदे, मारुती शिंदे, बाळकृष्ण जाधव, विजय शिंदे, संदीप साबळे, दिलीप वाघमळे, बाळकृष्ण साबळे, पांडूरंग लगस, नंदकुमार जाधव, बजरंग साळुंखे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंदोलनस्थळावरून आणि संजय भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता यापुढील काळात साखर कारखाने स्वाभिमानीनेच चालवावेत, असे मदन भोसले यांनी स्पष्ट करताच ‘करार करा... किसन वीर कारखाना आम्ही चालवून दाखवितो. एवढेच नव्हे तर सर्व साताऱ्यात आम्ही पेढे वाटतो...’ असे प्रतिआव्हान ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावर मदन भोसले यांनी मौन मौन बाळगले. नंतर मात्र, त्यांनी तसे होत नसते. कारखान्याचे अर्थशास्त्र वेगळे आणि बोलणे वेगळे असे सांगत या संपूर्ण विषयाला बगल दिली आणि दुसऱ्या हप्त्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीनंतर घेण्याचे आश्वासन दिले. -२२ जुलै : सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी-२४ जुलै : माजी आमदार शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील निवासस्थानी-२६ जुलै : कोरेगाव-चिमणगाव येथे जरंडेश्वर कारखाना स्थळ-२८ जुलै : सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांचे निवासस्थान-३0 जुलै : डोंगराई कारखाना कार्यस्थळ