या वेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, मंडल अधिकारी महेश पाटील, विनायक पाटील, तलाठी श्रीकृष्ण मर्ढेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अठरा गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सध्या केवळ एक रुग्णवाहिका आहे. ही रुग्णवाहिका प्रामुख्याने गर्भवती, बाळंत महिला, आरोग्य कर्मचारी, लस व औषधांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येते. याव्यतिरिक्त सदाशिवगड विभागातील एकाही गावात रुग्णवाहिकेची व्यवस्था नाही. शासनाची १०८ रुग्णवाहिका बेड निश्चित असल्याशिवाय येत नाही. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कऱ्हाड शहरातून खासगी रुग्णवाहिका पाचारण केल्यास अडीच ते तीन हजार रुपये खर्च येत आहे. परिणामी अनेक रुग्णांना रिक्षा अथवा खासगी वाहनांतून न्यावे लागत आहे. याची दखल घेत हजारमाची ग्रामपंचायत सदस्य शरद कदम, पितांबर गुरव, सोमनाथ सूर्यवंशी, विनोद डुबल, जयश्री पवार, ऐश्वर्या वाघमारे, संगीता डुबल व सारिका लिमकर या सदस्यांनी लोकवर्गणीतून रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.
या वेळी अॅड. चंद्रकांत कदम, अॅड. दादासाहेब जाधव, विश्वासराव पाटील, उदयसिंह पाटील, दीपक लिमकर, प्रकाश पवार, शिवाजीराव सवळेकर, बाबासाहेब पवार, राजू काटवटे, बबनराव पवार, सतीश पवार, जयवंतराव विरकायदे, कुमार इंगळे, संदीप कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : ०१केआरडी०२
कॅप्शन : हजारमाची, ता. कऱ्हाड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.