शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

शेअर्सची अफरातफर करून ७० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:38 IST

डिमॅट अकौंट धारकाच्या बनावट सह्या करून, शेअर अकौंटशी सलग्न मोबाईल क्रमांक बदलून विना संमती सात हजार शेअरची अफरातफर करून एका वद्धाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात शहरातील एका बँकेतील शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे

ठळक मुद्देशेअर्सची अफरातफर करून ७० लाखांची फसवणूकवृद्धाची तक्रार ; बँकेतील शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा

सातारा : डिमॅट अकौंट धारकाच्या बनावट सह्या करून, शेअर अकौंटशी सलग्न मोबाईल क्रमांक बदलून विना संमती सात हजार शेअरची अफरातफर करून एका वद्धाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात शहरातील एका बँकेतील शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.डीमॅट अकौंटचे व्यवहार पाहणारा रोहित शिवाजी शेळके (रा. शेळकेवाडी, ता. सातारा), शाखा व्यवस्थापक, डिमॅट खात्याचे व्यवहार पाहणारे व सहीची शहानिशा करण्याचे अधिकार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांविरूद्ध ही फिर्याद दाखल झाली आहे. याबाबत दत्ता शामराव नरगुंदे (वय ७०, रा. यादोगोपाळ पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.नरगुंदे यांच्या फियार्दीनुसार, १९८० पासून शेअर खरेदी करण्यास नरगुंदे यांनी सुरवात केली. ही खरेदी व विक्री ते ब्रोकर मार्फत करत होते. सुरवातीला त्यांचे व पत्नीचे अशी दोघांची संयुक्त खाती होती. पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी २०१५ साली संयुक्त खाते बंद करून स्वत:च्या खात्यावरून खरेदी सुरू केली. त्यांनी महाराष्ट्र स्कुटर, एशियन पेंटस, ब्ल्यूस्टार, सिप्ला, ग्रासीम, अल्ट्राटेक अशा विविध कंपन्यांचे शेअरर्स खरेदी केले होते.जून २०१८ मध्ये एनएसडीएलकडून आलेल्या स्टेटमेंटची पाहणी केल्यावर महाराष्ट्र स्कूटर कंपनीचे ८० शेअर्स कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शहरातील एका बँकेत जाऊन डीमॅट अकौंटचे व्यवहार पाहणारे शेळके तसेच शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली. त्यांनी याची चौकशी करतो, असे सांगितले.

विविध कंपनीचे एकुण सात हजार शेअर्स कमी झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही ते शेळके व शाखा व्यवस्थापकाला भेटले. व्यवहार न करता शेअरर्सची विक्री कशी झाली याबाबत नरगुंदे यांनी विचारणा केली.

यावेळी त्यांना प्रिंटींग मिस्टेक असेल, बँकेचे व्हर्जन बदलले आहे, थोडे थांबा, आम्ही चौकशी करतो, अशी कारणे सांगण्यात आली. यानंतर फेब्रुवारी महिन्यात शेळके त्यांच्या घरी गेला होता. शेअर्सची विक्री मीच केली असून यात अफरातफरही मीच केली आहे.

शेअर्सच्या अफरातफरीबाबत कोठेही तक्रार करू नका, आपले पैसे मी सवडीने परत करीन. तक्रार करू नका, असे त्याने सांगितले. परंतु, लेखी मागितल्यावर तसे दिले नाही. तसेच पैसेही दिले नाहीत. त्यामुळे नरगुंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शेळके, बँक व्यवस्थापक, व डिमॅट अकौंटशी संबंधित व्यवहार पाहणाऱ्या सर्वांविरूद्ध फिर्याद दिली.संशयितांची संख्या वाढणार?शेअर, खरेदी विक्रीमध्ये पहिल्यांदाच तब्बल ७० लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हा गुन्हा अत्यंत किचकट असून, यामध्ये आणखी नेमके किती संशयित आरोपी सहभागी असतील, हे तपासअंतीच समोर येणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी