शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत ट्रेनमध्ये नोकरीचे आमिष; पावणेदोन कोटींची फसवणूक, चेंबूरच्या नगरसेविकेसह अकराजणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:26 IST

मेढा पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : वंदे भारत ट्रेन व सार्वजनिक बांधकाम विभागात मुलांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या आरोपावरून चेंबूरच्या नगरसेविकेसह अकराजणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शरीफा टाटा खान (नगरसेविका, चेंबूर, मुंबई), समीर चुंडमुंग, जहीर अमानुल्ला खान, इमान अमानुल्ला खान, नीलेश बाळकृष्ण ठाकूर, आनंद सिंग ऊर्फ बाबू शेठ ऊर्फ अंकल (रा. मुंबई व रांची, झारखंड), रेणू रामूसिंग ऊर्फ रेणू नीलेश ठाकूर, आशिष अगरवाल (रेल्वे विभाग अधिकारी), सुधीर गायकवाड (बांधकाम विभाग, मुंबई), किशोर माळी (बांधकाम विभाग, मुंबई), शामल मुखर्जी (मंत्रालय, मुंबई), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत शैलेश काशिनाथ पवार (वय ४८, रा. महिगाव, ता. जावळी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांनी व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. बँक ऑफ महाराष्ट्र, सायगाव (ता. जावळी) येथील खात्यामार्फत तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर व मुंबई येथे संशयितांना रोख रक्कम व यूपीआय व्यवहाराद्वारे एकूण एक कोटी ८० लाख रुपये दिले. मात्र, पैसे परत द्यावे लागू नये म्हणून रेल्वे व बांधकाम विभागात भरती निघाली असल्याचे आम्हाला खोटे सांगितले. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मुलांना वेळोवेळी ई-मेल, व्हाॅट्सॲप, मेसेज व फोन करून नियुक्तीबाबत खोटे व बनावट आदेश तयार केले. बांधकाम विभागाच्या कार्यालयात हजर करून मुलाखती घेऊन जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर, सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी मुलांच्या खोट्या वैद्यकीय तपासण्या केल्या. नेमणुकीचे खोटे पत्र तयार करून मला व मुलांना पाठविल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Job Scam: Crores Lost, Councilor Among Accused

Web Summary : Job seekers were duped of ₹1.8 crore with false promises of jobs in Vande Bharat and the Public Works Department. A corporator and ten others are booked for fraud, accused of fake appointments and medical tests.