शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Crime News लाचखोर पोलिसाला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा; तलाठ्याचा मदतनीसह जाळ्यात-: लाचलुचपतची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 10:49 IST

मुलाच्या शाळेतील स्नेह संमेलन पाहण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी ....

ठळक मुद्देकोरेगाव पोलीस ठाणे : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी स्वीकारले होते पैसे

सातारा : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कोरेगाव पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस हवालदार रमेश सदाशिव मदने (वय ४८, रा. अंगापूर, ता. सातारा) याला विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्तिवर ७ सप्टेबर २०१५ रोजी ४९८ (जाचहाटसह) विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तत्कालीन पोलीस हवालदार रमेश मदने याने तीन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर दुसºया दिवशी ८ सप्टेबर २०१५ रोजी रमेश मदने याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी तीन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.

तत्कालीन पोलीस उपधीक्षक सुहास नाडगौडा यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने हवालदार रमेश मदने याला चार वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील लक्ष्मणराव खाडे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार विजय काटवटे, पोलीस नाईक संजय अडसूळ यांनी त्यांना सहकार्य केले.

  • काशीळ येथील तलाठ्याचा मदतनीस जाळ्यात,  खरेदी दस्त नोंदण्यासाठी स्वीकारले पैसे

सातारा : खरेदी दस्ताची सातबारा उता-यावर  नोंद करण्यासाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना काशीळ, ता. सातारा येथील तलाठ्याचा खासगी मदतनीस गजानन बाळासाहेब माने (वय ३०, रा. बेघर वसाहत, काशीळ) याला लाचलुचतपच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास काशीळमधील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आली.

याबाबात अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदार महिलेला खरेदी केलेल्या दस्ताची नोंद करायची होती. त्यासाठी त्या काशीळ येथील तलाठी कार्यालयात शुक्रवारी सकाळी गेल्या होत्या. यावेळी तलाठ्याचा मदतनीस गजानन माने याने त्यांना नोंद झाल्यानंतर सातबारा उतारा देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती अखेर साडेतीन हजार रुपये देण्याचे ठरले. संबंधित महिलेने लाचलुचपत कार्यालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिका-यांनी कसलाही वेळ न दवडता तत्काळ काशीळ येथील तलाठी कार्यालय गाठून सापळा लावला. तक्रारदार महिलेकडून साडेतीन हजार रुपये घेताना गजानन माने याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याला साता-यातील लाचलुचपत कार्यालयात आणण्यात आले. बोरगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुंखे, प्रशांत ताटे, विनोद राजे, संजय आडसूळ, संभाजी काटकर, विशाल खरात, शितल सपकाळ यांनी ही कारवाई केली.

  • महिलेचे साडेपाच तोळ्याचे गंठण हिसकावले.............

सातारा : मुलाच्या शाळेतील स्नेह संमेलन पाहण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी,  स्मिता भरत निंबाळकर (वय ३७, रा. उत्तेकरनगर,सातारा) या गुरुवार दि. २८ रोजी सायंकाळी पाच वाजता तामजाईनगर येथील त्यांच्या मुलाच्या शाळेत स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता त्या घरी जाण्यासाठी शाळेच्या पार्किंगमध्ये त्यांच्या दुचाकीकडे निघाल्या होत्या. त्यावेळी दोन तरूणांनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे गंठण हिसकावले.

निंबाळकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर इतर लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे सापडले नाहीत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, सहायक  पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करत आहेत

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी