शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ दाखवून चार लग्न मोडली, साताऱ्यातील दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 13:40 IST

जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकाने पीडित मुलीची यापूर्वी तब्बल चार लग्न अश्लील व्हिडीओ दाखवून मोडली.

ठळक मुद्देअश्लील व्हिडीओ दाखवून चार लग्न मोडली, साताऱ्यातील दोघांवर गुन्हासासरच्याही लोकांना व्हिडीओ पाठविण्याची धमकी

सातारा : जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकाने पीडित मुलीची यापूर्वी तब्बल चार लग्न अश्लील व्हिडीओ दाखवून मोडली. एवढेच नव्हे आता सासरच्या लोकांनाही हा व्हिडीओ पाठविण्याची त्याने धमकी दिली.या साऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित युवतीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांसमोर आपबिती सांगितली. अशोक यादव, शिवाजी यादव (रा. खिंडवाडी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील एका कंपनीत काम करत असताना अशोक यादव याच्याशी युवतीशी ओळख झाली. तो तिला आॅफिस सुटल्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर घरी सोडत होता. एके दिवशी ती घरी एकटीच असताना अशोकने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती केली. त्याचे त्याने व्हिडीओ शूटिंग केले.काही दिवसानंतर तिने अशोकसोबत बोलणे बंद केल्यानंतर त्याने मोबाईलवर कॉल करून शरीरसुखाची मागणी केली. त्यास तिने नकार दिल्याने त्याने काढलेल्या व्हिडीओ तिच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने साताऱ्यातील लॉजवर तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, तिचे लग्न ठरले असता त्या मुलांना व्हिडीओ पाठवून आमचे शारीरिक संबंधआहेत, असे सांगून त्याने तिचे चार लग्न मोडली. अशाप्रकारे अशोक गेल्या अनेक वर्षांपासून तिचा पाठलाग करत तिला जीवे मारण्याची तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करत होता.

तसेच व्हिडीओ डिलिट करण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्यानंतर हा व्हिडीओ पती व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार विवाहितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर