शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी

By दत्ता यादव | Updated: July 17, 2024 13:39 IST

महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील घटना

सातारा : सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील वेण्णा नदीच्या पुलावरून कार चाळीस फूट खोल कोसळून चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात काल, मंगळवारी रात्री दहा वाजता झाला असून, जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जावळी तालुक्यातील करहरमधील एक कुटुंबीय महाबळेश्वरहून साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी आंबेघर, ता. जावळी येथील गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलाचा छोटा संरक्षक कठडा तोडून वेण्णा नदीत कोसळली. यात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर माेठा आवाज झाल्याने आंबेघरमधील ग्रामस्थ तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी जखमींना नदीतून बाहेर काढले. कोणाच्या डोक्याला तर कोणाच्या हातापायाला जखम झाली. तब्बल चाळीस फुटांवरून कार नदीत कोसळल्याने कारचेही मोठे नुकसान झाले. पाण्यात कार कोसळल्याने कारमधील लोकांना फारसी जखम झाली नसल्याचे मेढा पोलिसांनी सांगितले.ना दिशादर्शक, ना संरक्षक कठडेमहाबळेश्वर रस्त्यावरील केळघर परिसरात असणाऱ्या पुलावर कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे नाहीत. तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवख्या वाहन चालकाला रस्त्याच्या अंदाज येत नाही. परिणामी अशाप्रकारे अपघात होत आहेत. या रस्त्याचे नुकतेच रुंदीकरण आणि डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. परंतु इतर उपाययोजना केल्या गेल्या नसल्यामुळे जीवघेणे अपघात होत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानcarकारAccidentअपघात