शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीतील चारजणांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:36 IST

कऱ्हाड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बांधलेल्या सांस्कृतिक व सामाजिक सभागृहाला माजी सरपंच शामराव आबाजी चव्हाण हे नाव देण्यात आले आहे. या नावावरून आक्रमक पावित्रा घेत हे नाव काढून टाकण्यात यावे, या मागणीसाठी दीड वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे सांगत गुरुवारी कऱ्हाडपंचायत समिती येथे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या केबिनमध्ये ग्रामपंचायत सदस्य, तक्रारदार व अन्य दोघांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देकऱ्हाड पंचायत समितीतील प्रकार गटविकास अधिकाऱ्यांसमोरच घेतले अंगावर रॉकेल ओतून

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बांधलेल्या सांस्कृतिक व सामाजिक सभागृहाला माजी सरपंच शामराव आबाजी चव्हाण हे नाव देण्यात आले आहे. या नावावरून आक्रमक पावित्रा घेत हे नाव काढून टाकण्यात यावे, या मागणीसाठी दीड वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे सांगत गुरुवारी कऱ्हाडपंचायत समिती येथे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या केबिनमध्ये ग्रामपंचायत सदस्य, तक्रारदार व अन्य दोघांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या सामाजिक सभागृहाला देण्यात आलेले शामराव आबाजी चव्हाण हे नाव काढून टाकण्यात यावे, अशी तक्रार गावातील महेश धर्मेंद्र पाटील यांनी वर्षभरापूर्वी केली होती. या तक्रारीवरून सदस्य बंडोराव ज्ञानदेव सावंत यांच्यासह सदस्य तसेच काही ग्रामस्थांनी सभागृहास दिलेल्या नावास विरोध केला तर ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी हे नाव काढले जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

ग्रामपंचायतीमधील या दोन्ही गटांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी हे नाव कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याने ते काढून टाकण्यात यावे, असे पत्र ग्रामसेवक चंद्रकांत धिंदळे यांना दिले. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे तक्रारदार महेश पाटील यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही याबाबतचे पत्र दिले होते.

दरम्यान, गुरुवारी दोन्ही गटांतील सदस्य व तक्रारदार यांना चर्चेसाठी गटविकास अधिकारी डॉ. पवार यांनी कार्यालयात बोलावले. बैठकीस सरपंच वंदना माळी, ग्रामसेवक चंद्रकांत धिंदळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

बैठकीत गटविकास अधिकारी डॉ. पवार यांनी चिखली येथील सांस्कृतिक सभागृहास दिलेले संबंधितांचे नाव काढावे लागेल, असे सदस्यांना सांगितले. मात्र सदस्यांनी ते नाव काढणार नसल्याचे सांगितले, त्यामुळे नाराज झालेल्या तक्रारदार महेश पाटील, सदस्य बंडोराव सावंत, विजय सदाशिव जगताप, बापूराव रामदास जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातच अधिकाऱ्यांसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करीत त्यांना रोखले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी संबंधितांना कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर