शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकाचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:12 IST

ट्रक चालकाचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या चौघांना शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक चाकू, दोन कोयत्यांसह कार जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएक चाकू, दोन कोयत्यांसह कार जप्त सातारा तालुका अन् शाहूपुरी पोलिसांची संयुक्त कारवाई

सातारा : ट्रक चालकाचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या चौघांना शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक चाकू, दोन कोयत्यांसह कार जप्त करण्यात आली आहे. अजय गणेश अवतडे (वय २०), ऋतिक शिवाजी शिंदे (वय २०, रा. गोडोली सातारा), सनी सुरेश देशमुख (वय १९, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, मध्यप्रदेशातील एक ट्रक चालक दि. २० रोजी सायंकाळी पाच वाजता माल घेऊन फलटणकडे निघाला होता. यावेळी वाढे फाटा परिसरात चारचाकी आडवी मारून वरील संशयितांनी ट्रक थांबविला. त्यानंतर ट्रक चालक राघवेंद्रसिंह श्रीमोहनसिंह (रा. मध्यप्रदेश) याचे शस्त्राचा धाग दाखवून त्यांनी कारमधून अपहरण केले.

या प्रकाराची माहिती शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरणला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ वाढे फाटा येथे धाव घेतली.

पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता संबंधित संशयितांनी तीन हजार रुपये आणि मोबाइल हिसकावून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. मात्र, त्यांचा आणखी एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू मुलाणी, पोलीस नाईक सुजीत भोसले, हसन तडवी, ओंकार यादव यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर