शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

माजी उपसभापतीच्या मुलाचा करणार होते खून, चौघांना अटक; हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 22:18 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहागाव येथील प्रीतम पाटील हा बेलवडे हवेली गावच्या हद्दीतील हॉटेल आनंद चालवितो. त्याच्या हॉटेलवर ७ जुलै रोजी शिरवडे येथील आयुष सुहास बोराटे हा जेवण करण्यासाठी आला होता.

कऱ्हाड : हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून वाद झाल्यानंतर हॉटेलची तोडफोड करून जाणाऱ्याचा खून करण्याचा कट चौघांनी रचला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा हा डाव फसला. रात्रगस्त पथकाने संबंधित चौघांना कुऱ्हाड, कोयता, चाकू अशा धारदार शस्त्रांसह ताब्यात घेऊन अटक केले. तासवडे (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

प्रीतम चंद्रकांत पाटील (३१), सागर अशोक पवार (३५), किरण मोहन पवार (३१, तिघेही रा. वहागाव, ता. कऱ्हाड) व ऋषिकेश अशोक पाटील (२२, रा. येणके, ता. कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, आरोपी ज्या युवकाचा खून करणार होते. तो युवक कऱ्हाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहागाव येथील प्रीतम पाटील हा बेलवडे हवेली गावच्या हद्दीतील हॉटेल आनंद चालवितो. त्याच्या हॉटेलवर ७ जुलै रोजी शिरवडे येथील आयुष सुहास बोराटे हा जेवण करण्यासाठी आला होता. त्यावेळी आयुष बोराटे व हॉटेल चालक प्रीतम पाटील यांच्यात जेवणाच्या ऑर्डरवरून वाद झाला. त्यावेळी आयुष याने त्याचा भाऊ वेदांत तसेच बाळू यादव यांना बोलावून आनंद हॉटेल व दुचाकीची मोडतोड केली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. हा राग मनात धरून हॉटेल चालक प्रीतम पाटील तसेच त्याचा मित्र सागर पवार, किरण पवार, ऋषिकेश पाटील यांनी १० जुलै रोजी हॉटेल आनंद येथे एकत्र येऊन आयुष बोराटे याच्या खुनाचा कट रचला. यावेळी हॉटेलमध्ये असणारी कुऱ्हाड, चाकू, कोयता घेऊन दुचाकीच्या नंबरप्लेटला त्यांनी राख व माती लावून नंबर बुजवला. चौघे त्या दुचाकीवरून शिरवडे येथे जात असताना रात्रगस्तीवर असणारे तळबीड पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस हवालदार वाघमारे व चालक पाटील यांना बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मध्यरात्री २ वाजता हे आरोपी दिसले. त्यावेळी महिला पोलिस हवालदार वाघमारे यांना संशय आल्यामुळे त्यांनी आरोपींना थांबण्याचा इशारा केला. मात्र, आरोपींनी दुचाकी न थांबवता भरधाव निघून गेले. पोलिसांनी पाठलाग करून तासवडे टोलनाक्याजवळ औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या मार्गावर आरोपींना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आयुष सुहास बोराटे याचा खून करण्यासाठी जात असल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे अधिक तपास करीत आहेत.

धारदार शस्त्र हस्तगत

पळून जात असताना आरोपींनी त्यांच्याजवळील कुऱ्हाड, चाकू व कोयता महामार्गानजीक एका झाडाजवळ टाकून दिला होता. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी ती शस्त्रे पोलिसांना दाखवली. पोलिसांनी शस्त्र जप्त केली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKaradकराड