शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील माजी नगरसेवक बाळू खंदारेला अटक

By दत्ता यादव | Updated: February 27, 2023 22:29 IST

प्राणघातक हल्लाप्रकरण; उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : पिस्तूल दाखवून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताच माजी नगरसेवक बाळू खंदारे हा शहर पोलिस ठाण्यात सोमवारी स्वत:हून हजर झाला. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सनी भोसले (रा. सातारा) हा मित्रांसमवेत तालीम संघावरून जात असताना कारमधील काही तरुणांनी माजी नगरसेवक बाळू खंदारे याच्या कार्यालयाकडे बघून शिवीगाळ केली होती. यावरून माजी नगरसेवक बाळू खंदारे याने सनी भोसले याला फोन करून त्याचा जाब विचारत त्याला तालीम संघावर बोलावून घेतले. यावेळी खंदारेसह त्याच्या साथीदारांनी सनी भोसले व त्याच्या सहकाऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना ८ सप्टेंबर २०२१ रोजी घडली होती. याप्रकरणी बाळू खंदारेसह एकूण १५ जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, बाळू खंदारे याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने खंदारे याने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. गेल्या दीड वर्षापासून यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. काही दिवसांपूर्वी खंदारेचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे तो सोमवारी दुपारी सातारा शहर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्याला दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.युक्तिवादावेळी अचंबित करणारे किस्से चर्चेला...

न्यायालयात युक्तिवादावेळी काही अचंबित करणारे किस्से चर्चेला आले. या प्रकरणातील संशयितांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या केबिनचा खर्च केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्यामुळे पोलिसांचे या संशयितांना अभय होते, असा आरोपही झाला. युक्तिवादाच्या निमित्ताने नव्यानेच हे प्रकरण समोर आल्याने तो अधिकारी कोण, अशी चर्चा आता पोलिस दलात रंगली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी