शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सैदापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले फलक अज्ञातांनी फाडले, थेट समोर येण्याचे काँग्रेसप्रेमींचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 18:12 IST

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर गावाच्या विकासकामांसाठी सुमारे ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीबाबत चव्हाण यांच्या अभिनंदन व आभाराचे फलक सैदापूर परिसरात लावले आहेत.

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर गावाच्या विकासकामांसाठी सुमारे ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीबाबत चव्हाण यांच्या अभिनंदन व आभाराचे फलक सैदापूर ग्रामस्थ तसेच काँग्रेस कमिटीच्या वतीने परिसरात लावले आहेत. त्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय ते आयटीआय मार्गावर असणारे फलक काही समाजकंटकांनी फाडून नुकसान केले. हा प्रकार निंदनीय आहे. विरोधकांनी असे लपून-छपून कृत्य न करता हिम्मत असेल तर थेट पुढे यावे, असे आव्हान सैदापूरमधील काँग्रेसप्रेमींनी दिले आहे.माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सैदापूरसाठी नागरी आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवून दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पन्नास लाख तसेच रस्त्यांसाठी काही निधी मंजूर करून दिला. याबद्दल सैदापूर ग्रामस्थ व काँग्रेसप्रेमींनी या परिसरात ठिकठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अभिनंदनाचे फलक लावले. त्यातील आयटीआय रोड ते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्गावरील काही फलक फाडण्यात आले. त्याबद्दल ग्रामस्थ तसेच काँग्रेसप्रेमी आक्रमक झाले. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यामध्ये कऱ्हाड तालुका काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब जाधव, खादी ग्रामोद्योगचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, माजी उपसरपंच सचिन पाटील, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब प्रल्हाद जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी माळी आदींसह काँग्रेसप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण