शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

राज्य पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:34 IST

नितीन काळेल, सातारा : शेतीतील योगदानाबद्दल जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना राज्य शासनाने यावर्षी कृषी पुरस्कार जाहीर केला. मात्र, या पुरस्कारार्थींचा ...

नितीन काळेल, सातारा : शेतीतील योगदानाबद्दल जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना राज्य शासनाने यावर्षी कृषी पुरस्कार जाहीर केला. मात्र, या पुरस्कारार्थींचा जिल्हा परिषदेला विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण, आतापर्यंत त्यांचा ना सन्मान झाला, ना कोणी अभिनंदन केले. आतातरी कºहाडातील कृषी प्रदर्शनात तरी या राज्य पुरस्कारार्थींचा सन्मान होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.भारत देश कृषीप्रधान आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता ही शेतीवरच अवलंबून आहे. ग्रामीण भागाचा शेती हाच प्रमुख आर्थिक कणा राहिलाय. त्यामुळे शेतीच महत्त्वाचा घटक ठरलेला आहे. शेती चांगली साधली तरच बाजारपेठेतही भरभराट असते. शेतकºयांच्या कुटुंबातही आनंद असतो. त्यामुळे शेतीक्षेत्रात योगदान देण्याºया, पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पन्न घेणाºया, इतर शेतकºयांपुढे आदर्श निर्माण करणाºया शेतकºयांचा जिल्हा परिषद तसेच राज्य शासनही गौरव करते. त्यामुळे संबंधित शेतकºयांना प्रोत्साहन मिळून त्यांच्याकडून शेतीक्षेत्रात अनेक नवनवीन पीकपद्धती पुढे येतात. यामधून इतर शेतकºयांनाही नवीन काही शिकता येते.राज्य शासनाचे दीड महिन्यापूर्वीच कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील काही शेतकºयांना हे पुरस्कार मिळालेत. हे पुरस्कार २०१७ वर्षातील असून, यामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा कोल्हापूर कृषी विभागाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला प्रथमच मिळालाय. याबरोबरच कृषिभूषण, शेतीनिष्ठ आणि इतरही पुरस्कार जिल्ह्यातील शेतकºयांना मिळाले आहेत. या पुरस्कारामुळे जिल्हा परिषदेचे नाव राज्यस्तरावर पोहोचले आहे. मात्र, आता पुरस्कारार्थींचा सर्वांनाच विसर पडला की काय ? अशी चर्चा सुरू आहे.कºहाडमध्ये १६ वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन सुरू झाले आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन असून, याचे आयोजक कºहाडची शेती उत्पन्न बाजार समिती असलीतरी सहआयोजक राज्याचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषदही आहे. खºया अर्थाने कºहाडमधील या प्रदर्शनाततरी राज्य पुरस्कारप्राप्त शेतकºयांचा सन्मान होईल का याचीही चर्चा आहे. कारण, आतापर्यंत पुरस्कारप्राप्त शेतकºयांना जिल्हा परिषदेने गौरविले नाही. आतातरी कºहाडच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने तरी या शेतकºयांचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा असणार आहे;ऐकीकडे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन घ्यायचे तर दुसरीकडे जिल्ह्णाचे नाव राज्यस्तरावर पोहोचविणाºया शेतकºयांचा विसर पडावा, हे विसंगत आहे. त्यामुळे शेतीत योगदान देणाºया व राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाºया शेतकºयांचा सत्कार कधी होणार हे पाहणेही महत्वाचे ठरले आहे.सन्मानाला आताच उशीर का ?राज्य कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकºयांचे प्रस्ताव हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच राज्यस्तरावर पाठविले होते. आता २०१७ मधील राज्यस्तरावरील कृषी पुरस्कार जाहीर होऊन दोन महिने झाले आहेत. राज्याचे पुरस्कार मिळाले त्या शेतकºयांचे जिल्हा परिषदेतील कोणी साधे अभिनंदनही केले नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. तर काही वर्षांपूर्वीच राज्यस्तर पुरस्कार मिळालेल्या शेतकºयांना कºहाडच्या याच कृषी प्रदर्शनात सन्मानित केले होते. आताच्या पुरस्कारार्थींसाठी एवढा उशीर का? असाही प्रश्न आहे.