शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

वनपालाचा जैवविवधेवर अभ्यास -। कास पुष्पपठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 19:29 IST

पर्यटकांना माहिती देण्यासाठी अनेक गाईड निर्माण करणारे श्रीरंग शिंदे हे सध्या वनपाल म्हणून कार्यरत आहेत. जंगल, जैवविविधता रक्षण व संरक्षणाबाबत केलेल्या कार्यातून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

ठळक मुद्दे२ आॅक्टोबर २०१० मध्ये कास पठाराला भेट दिलेल्या अमेरिका व स्वीत्झर्लंडच्या शास्त्रज्ञांना कास पठाराबाबत माहिती देण्याची संधी त्यांना मिळाली होती.

सागर चव्हाण ।पेट्री : फुलांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कास पठारावरील दुर्मीळ वनस्पती, फुलांचा वनपाल श्रीरंग शिंदे हे चौदा वर्षांपासून अभ्यास करत आहेत. त्यांनी चार वर्षांपूर्वी पुष्पवैभवावर लिहिलेल्या दोन सचित्र पुस्तकांचे यंदा इंग्रजीत अनुवाद होत आहे.

पर्यटकांना माहिती देण्यासाठी अनेक गाईड निर्माण करणारे श्रीरंग शिंदे हे सध्या वनपाल म्हणून कार्यरत आहेत. जंगल, जैवविविधता रक्षण व संरक्षणाबाबत केलेल्या कार्यातून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पठारावरील वनस्पती, त्यांचे गुणधर्म, फुलण्याच्या दिवसांची संपूर्ण माहिती त्यांना तोंडपाठ आहे.

श्रीरंग शिंदे हे १९८२ मध्ये वनविभागात रुजू झाले. त्यांनी तीन वर्षे वनमजूर, एकोणतीस वर्षे वनरक्षक व गेल्या पाच वर्षांपासून वनपालपदी कार्यरत आहेत. ते २००६ पासून सह्याद्री घाट, कास पुष्प पठारावरील अनेकविध जैवविविधतेचा अभ्यास करत आहेत. त्याचे फलित म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तके, पठारावर पर्यटकांना माहिती देण्यासाठी घडवलेले गाईड होय.

इंटरनेटवर एका क्लिकमध्ये जगाची सर्व माहिती उपलब्ध होते तसे वनपाल शिंदे यांना पठारावरील कोणत्याही वनस्पती व फुलांची माहिती विचारली असता काहीक्षणातच वस्तुनिष्ठ माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देण्याचा हातखंडा आहे. त्यासाठी ते सर्व माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.'अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना मार्गदर्शनअनेकविध वनस्पती, फुले कशी ओळखायची याचे बाळकडू आजोबा व आईकडून मिळाले. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या शिंदे यांनी बामणोली ते तळदेव असा पायी प्रवास करून शिक्षण घेतले. आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबवावे लागले. दुर्मीळ वनस्पती ओळखायची आवड असल्याने ते वनविभागात रुजू झाले. अभ्यासात उपवनसंरक्षक सुनील लिमये, सहायक वनसंरक्षक शिवाजीराव फुले, वनसंरक्षक एन. के. राव यांचे सहकार्य लाभले. २२ आॅक्टोबर २०१० मध्ये कास पठाराला भेट दिलेल्या अमेरिका व स्वीत्झर्लंडच्या शास्त्रज्ञांना कास पठाराबाबत माहिती देण्याची संधी त्यांना मिळाली होती. 

२००३ ते २००५ या काळात महाबळेश्वर, कास, ठोसेघरसह १६ पठारांची माहिती देण्यासाठी नेमणूक झाली होती. आयुर्वेदाचार्य संजय लिमये यांच्यासोबत चार वर्षे विविध वनस्पतींचा अभ्यास केला. आत्तापर्यंत १३७ वनस्पतींचा अभ्यास झाला आहे.- श्रीरंग शिंदे, वनपाल, वनविभाग 

 

अनेक वनस्पती तज्ज्ञांनी कास पठारावरील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत; परंतु वन कर्मचाऱ्यानेच पुस्तक लिहिण्याची घटना गेल्या चार वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच घडली होती. पठाराविषयी दोन पुस्तके लिहिली असून, शंभर वनस्पतींची माहिती असलेले मोठे पुस्तक लिहिले आहे.- सचिन डोंबाळे, 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठार