शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून बांधणार वनराई बंधारे

By admin | Updated: October 13, 2015 23:56 IST

विसापूर ग्रामसभेत निर्धार : जलयुक्त शिवाराच्या कामास प्रारंभ

पुसेगाव : खटाव तालुका दुष्काळी पट्यात मोडत असल्याने विसापूर हे गाव देखील अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडते. गावच्या पश्चिम, दक्षिण बाजूस डोंगर, पठार व गावओढा, रामओढा व नाले ही फार मोठी नैसर्गिक संपत्ती लाभली आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरला जावा, याकरीता महात्मा गांधी जयंती सप्ताह व जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विसापूर ग्रामपंचायत व लोकसहभागातून गावओढ्यावर वनराई बंधारा करुन कामास सुरुवात करणार आहे, अशी माहिती सरपंच सागर साळुंखे यांनी दिली.विसापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच पै. सागर साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहाला श्री हनुमान मंदिरात सुरु झाली. ग्रामपंचायत सदस्य शहाजी साळुंखे यांनी ग्रामस्थांचे स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यानंतर शितोळे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आहार कशापध्दतीने दिला जातो, याविषयी माहिती दिली. रोजगार हमी योजनेतंर्गत मजुराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे करता येते. त्यासाठी १ लाख २५ हजार रुपये तर फळबाग लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० हजार रुपये या दरम्यान निधी मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, यामुळे मजुरांना कामही मिळेल. पाणलोट कामाविषयी कृषी अधिकारी एस. के. जगदाळे माहिती दिली, ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार, तलाठी एच. आर. बाबर आरोग्य सेवक देशमुख यांनी आपआपल्या विभागाची माहिती दिली. आरसीसी गटर, पाणी पुरवठा, पाणंद रस्ते यासह विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी सरपंच सागर साळुंखे म्हणाले की, ‘यावर्षी पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी सिमेंट बंधाऱ्याच्या माध्यमातून अडविले जावे, याकरीता शासन व प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले असून त्यामध्ये विसापूरचा समावेश आहे. या योजनेतून एका सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये पाणीसाठी चांगला झाला आहे. जिल्हाधिकारी व प्रांत यांच्याकडे जलयुक्तमधून ४ सिमेंट बंधारे तसेच कृषी विभागाचे जुने ६ दगडी सिमेंट बंधारे, लघु पाटबंधारे विभागाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारेची दुरूती व पाझर तलावाची उंची व गळत काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून निधी मिळावा. याकरीता मागणी करणार आहे. गावातील गटतट विसरुन गावच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.’ (प्रतिनिधी)‘राजस्व’ अभियानातून दाखले देणार‘राजस्व’ अभियानातून विद्यार्थ्यांना जातीचे, डोमासाईल, दाखले, रेशनिंंगकार्डसह विविध दाखले देण्याची व्यवस्था महसूल विभागाच्या माध्यमातून केली जाईल. महात्मा गांधी जयंती सप्ताह व जलयुक्त चे औचित्य साधून यापुढील काळात लोकसहभागातून वनराई बंधारा व तलावातील गाळ काढण्याची कामे लोकवर्गणी व लोकसहभागातून केली जातील. वनराई बंधारा केला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी व युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा.