शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

आटपाडीत वसतिगृहांची झाडाझडती

By admin | Updated: December 4, 2014 00:49 IST

निरीक्षकांकडून चौकशी : समाजकल्याण विभागाला आली जाग; अहवालही सादर

आटपाडी : आटपाडीतील शासकीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची वसतिगृहे म्हणजे छळछावण्या बनल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्तानंतर समाजकल्याण विभागाला जाग आली आहे. समाजकल्याण निरीक्षक एस. के. सुपनीकर यांनी दोन्हीही वसतिगृहांना भेट देऊन चौकशी केली आहे. चौकशीचा अहवाल या विभागाचे सहआयुक्त दीपक घाटे यांना दिला आहे. यावर कधी आणि कोणती कारवाई केली जाणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.येथील माणगंगा साखर कारखान्याच्या रस्त्यावर कौठुळी फाट्याजवळ समाजकल्याण विभागाने साडेसात कोटी खर्चून मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र दोन वसतिगृहे बांधली आहेत. मुलांच्या वसतिगृहाची क्षमता ८४ असून, प्रत्यक्षात तिथे ६४, तर मुलींच्या वसतिगृहाची क्षमता ६४ एवढी असून, सध्या तिथे इयत्ता आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ५० युवती रहात आहेत. सध्या मुलींच्या वसतिगृहाला महिला अधीक्षक नाही. हे पद रिक्त आहे. काही वर्षांपूर्वी विनयभंगासारख्या गंभीर घटनेमुळे एका महिला अधीक्षिकेच्या येथील वसतिगृहातील पतीवर गुन्हा दाखल झाला होता. त्या महिला अधीक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, तर त्यानंतर एका पांडुरंगाच्या नगरीच्या चेल्याने मुलींशी गैरवर्तन केल्याने त्या अधीक्षकाला मुलींच्या नातेवाईकांनी चोप दिला होता. याकडे समाज कल्याण विभाग दुर्लक्ष करीत आहे. सध्या मुलींच्या वसतिगृहाचा पदभार एस. एस. थोरात हे पाहात आहेत. या वसतिगृहातील सर्व प्रश्नांना ‘लोकमत’ने दि. २९ नोव्हेंबरच्या अंकात वाचा फोडली होती. त्यानंतर सोमवारी (दि. १ डिसेंबर) निरीक्षक सुपनीकर आटपाडीत आले. त्यांनी मुला-मुलींच्या अडचणींबाबत दोन्हीही वसतिगृहात जाऊन विचारणा केली. त्यावेळी मुला-मुलींनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. (वार्ताहर)