शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

फलटणमध्ये ओढ्यांना पूर; अनेक पूल पाण्याखाली...

By admin | Updated: September 23, 2016 23:54 IST

परतीच्या पावसाचा दणका : पुणे-पंढरपूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

सातारा : राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतानाच शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील खटाव, फलटण, पाटण तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे फलटण तालुक्यातील ओढ्यांना पूर आल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले होते. सातारा शहरात दुपारी तीननंतर अचानक पावसाला सुरुवात झाले. अवघा पंधरा मिनिटांच्या पावसानंतर सायंकाळी पाचनंतर काळे ढग जमा झाले होते. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. फलटण तालुक्यातील निंभोरे, सुरवडी परिसरात चांगला पाऊस झाला. दुपारनंतर आलेल्या पावसामुळे ओढे-नाले भरून वाहत होते. ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे पूर आला होता. त्यामुळे पुणे-पंढरपूर मार्ग तासबंद बंद होता. अनेक ठिकाणी विद्यार्थीही अडकून पडले होते. खटाव तालुक्यातील पुसेगाव परिसरात शुक्रवारी पावसाचा तडाखा बसला. शेतीच्या कामात मग्न असलेल्या शेतकऱ्यांची अचानक झालेल्या पावसामुळे पळापळ झाली. पाटण तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. शुक्रवारीही दिवसभर अधूनमधून पाऊस पडत होता. कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे परिस्थितीनुसार कमी अधिक उघडले जात होते. गुरुवारी रात्री साडेअकराला साडेसात फूट उघडलेले दरवाजे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दोन फुटांवर आणले. (प्रतिनिधी) पुरामुळे निंभोरेत विद्यार्थी अडकले ४मलटण : फलटण तालुक्यातील निंभोरे, सुरवडीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेतीनपासून मोठा पाऊस पडला. निंभोरे-काशिदवाडीमधील ओढ्यांना आलेल्या पुरामुळे पुणे-पंढरपूर महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती. यामुळे ठिकठिकाणी विद्यार्थीही अडकले होते. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ४ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक दुकानांत पाणी शिरले. ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण केले असले तरी पावसाच्या पाण्याने महामार्ग रोखून धरला होता. निंभोरेच्या तरुणांची संवेदनशीलता प्रचंड पाऊस पडल्याने आलेल्या पुराने अनेकजण अडकून पडलेले असताना पुराच्या पाण्यात उतरून दुचाकी चालक, विद्यार्थिनी, महिला तसेच वृद्ध यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम तरुण करत होते.