शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माढ्यात दुष्काळ असताना नेत्यांच्या विमानवाऱ्या; शरद पवार यांचा रणजितसिंह निंबाळकर यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 21:55 IST

शशिकांत शिंदे यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना खासदार पवार म्हणाले, विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच नाही. शशिकांत शिंदे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, परंतु आमचं नाणं खणखणीत आहे. त्याची आम्हाला चिंता नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : माढ्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे; परंतु माढ्यातील नेत्यांच्या मात्र विमानवाऱ्या सुरू आहेत, अशी खोचक टीका खासदार शरद पवार यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, यशवंतराव मोहिते अशा कर्तृत्ववान नेत्यांच्या विचारांचा पगडा आजही जिल्ह्यातील सर्वसामान्यांवर आहे. आज देशात जे घडत आहे, त्याला पर्याय देण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने पुरोगामी सातारा जिल्ह्यातून पहिले पाऊल टाकले आहे. आज हजारोंच्या संख्येने आलेल्या सातारकरांनी आमचा आत्मविश्वास वाढवला आहे, असे पवार म्हणाले.

शशिकांत शिंदे यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना खासदार पवार म्हणाले, विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच नाही. शशिकांत शिंदे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, परंतु आमचं नाणं खणखणीत आहे. त्याची आम्हाला चिंता नाही.सातारा हा बालेकिल्ला राहिला आहे का? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले, याचे उत्तर गतवेळच्या पोटनिवडणुकीत सातारकरांनी दिले आहे. याहीवेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष जिवाभावाने या निवडणुकीत उतरले आहेत. देशातील एकेक जागा लढवण्यासाठी सर्वांनी मोट बांधली आहे.

रघुनाथराजेंची भावना स्वच्छरामराजे, संजीवराजे स्वगृही परततील का? असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, फलटणचे रामराजे अथवा त्यांचे बंधू संपर्कात नाहीत. रघुनाथराजे यांनी अकलूजला मोहिते-पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते. त्यांची तशी इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेंबद्दल प्रजेने काय बोलावेउदयनराजे भोसले यांना उमेदवारीबाबत ताटकळत ठेवल्याविषयी छेडले असता पवार म्हणाले, राजेंबद्दल आम्हा प्रजेने काय सांगायचे. जी परिस्थिती आहे, ती तुम्हा सर्वांना दिसते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRanjitsingh Nimbalkarरणजितसिंह निंबाळकर