शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी साताऱ्यातील २४ किल्ल्यांवर ध्वजारोहण, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या अध्यक्षांनी दिली माहिती

By नितीन काळेल | Updated: January 24, 2024 18:08 IST

सातारा : शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे निमित्त साधून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे यावर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी महाराष्ट्रातील ३५० ...

सातारा : शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे निमित्त साधून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे यावर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अजिंक्यताऱ्यासह २४ किल्ले निवडण्यात आले आहेत, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यवाह हृषीकेश यादव यांनी दिली.याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, शिवराज्याभिषेक ही हिंदुस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठी आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. यावर्षी या घटनेला ३५० वर्षे होत आहेत. हे निमित्त साधून हा उपक्रम हाती घेतला आहे. सातारा ही मराठ्यांची शेवटची राजधानी. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख किल्ल्यांवर यावर्षी ध्वजारोहण होत आहे. यासाठी रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण मंडळाने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या कार्यवाह मानसी वैद्य आणि अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी सर्व सातारकरांनी या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही केले आहे.सातारचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गिर्यारोहक व एव्हरेस्टवीर आशिष माने म्हणाले, दि. २६ जानेवारीला साताऱ्यातील स्थानिक गिर्यारोहक निवडलेल्या किल्ल्यावर चढाई करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवणार आहेत. तर सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर सकाळी साडे आठ वाजता सातारचे असलेले आणि आता दक्षिण कमांडचे प्रमुख ब्रिगेडियर विजय जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, असे या उपक्रमाचे मार्गदर्शक डॉ. संदीप श्रोत्री आणि समन्वयक जयंत देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Fortगड