शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पाच वर्षांच्या मुलावर अत्याचार करुन केली हत्या, अल्पवयीन मुलगा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 17:15 IST

पाच वर्षांच्या मुलाला त्याने एका पडक्या घरात नेले. येथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आरडाओरड केल्याने दहावीतील मुलाने त्या चिमुकल्याचे तोंड आणि गळा दाबला.

सातारा : पाच वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करून दहावीतील मुलाने तोंड व गळा दाबून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना शहरापासून जवळच असलेल्या म्हसवे येथे घडली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा केवळ दोन तासांत उघडकीस आणून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर म्हसवे हे गाव आहे. या गावातील पाच वर्षांचा मुलगा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अचानक गायब झाला. गावातील नागरिक आणि घरातल्यांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.

अखेर एका व्यक्तीला त्या मुलाचा मृतदेह एका पडक्या घरात सापडला. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहोचली. या टीमने तत्काळ गावातील मुलांकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी हा प्रकार दहावीतील पंधरा वर्षांच्या मुलाने केला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आढेवेढे न घेता गुन्ह्याची कबुली दिली.पाच वर्षांच्या मुलाला त्याने एका पडक्या घरात नेले. येथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आरडाओरड केल्याने दहावीतील मुलाने त्या चिमुकल्याचे तोंड आणि गळा दाबला. त्यामुळे श्वास गुदमरून त्याचा जागीच मृत्यू झाला. असे पोलिसांच्या तपासात समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्याने हा गुन्हा उघडकीस आणला. यातील संशयित हा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याशी पोलिसांनी गोड बोलून माहिती काढली. त्यामुळे या हत्या प्रकरणाला वाचा फुटली.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, वैभव सावंत, मोहन पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.फॉरेन्सिक तज्ज्ञांना पुरावे सापडले!अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करून चिमुकल्याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिंग तज्ज्ञांना पाचारण केले. या टीमला घटनास्थळी काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले आहेत. तसेच पीडित मुलाच्या शवविच्छेदन अहवालानंतर आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी