शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus सातारा जिल्ह्यात आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा ५२१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:00 IST

जिल्ह्यात आत्तापर्यंत ५२१ कोरोना बाधित रुग्णांची संख्या असून, त्यापैकी १६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या  ३४० कोरोना बाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देपाचजणांचा मृत्यूपश्चात अहवाल निगेटिव्ह

 

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असून, सोमवारी आणखी पाचजण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याचा बाधितांचा आकडा आता ५२१ वर पोहोचला आहे. तसेच मृत्यूपश्चात पाचजणांच्या अहवालाबरोबरच २३७ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे  एकीकडे दिलासा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

सोमवारी सकाळी आणखी पाचजण कोरोना बाधित आढळून आले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील १ (६० वर्षीय पुरुष), वाई तालुक्यातील वोव्हाळी येथील १ (४२ वर्षीय पुरुष), जांभळी येथील १ (११ वर्षीय मुलगी), महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील १ (१० वर्षीय मुलगी) व हरचंदी येथील १ (६३ वर्षीय पुरुष) अशा एकूण ५ रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील ५७ वर्षीय पुरुष, पाथरवाडी, ता. कºहाड येथील ३३ वर्षीय पुरुष, साता-यातील बुधवार पेठेतील ६५ वर्षीय महिला, अंबेदरे आसरे ता. वाई येथील ४३ वर्षीय महिला तसेच  उंब्रज ता. कºहाड  येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पुणे येथून २२८ तर क-हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ९ अशा २३७ जणांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, जावळी तालुक्यातील रांजणी येथून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेल्या ८५ वर्षीय मृत महिलेचा नमुनाही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात नव्याने १४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ५२१ कोरोना बाधित रुग्णांची संख्या असून, त्यापैकी १६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या  ३४० कोरोना बाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या