शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

मारहाण करून पाच लाख लुटले

By admin | Updated: June 13, 2014 02:02 IST

इंदोली फाट्यावरील थरार : बिल्डरसह कार चालकालाही बेदम मारहाण

उंब्रज : पुण्याहून मालवणकडे निघालेल्या बिल्डरला इंदोली फाटा येथे लुबाडण्यात आले. सहा दरोडेखोरांनी बिल्डरला मारहाण करीत त्याच्याकडील पाच लाखांचा ऐवज लंपास केला. काल, बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत बिल्डर श्रीनिवास मनोहर अंधारी (वय ४८, रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण येथील बिल्डर श्रीनिवास अंधारी हे काही कामानिमित्त आपल्या कारमधून पुण्याला गेले होते. त्यांच्यासोबत कारचालक नीलेश सखाराम पारधी (वय ३०, रा. मालवण) हा होता. काल रात्री श्रीनिवास हे परत मालवणला जाण्यासाठी पुण्याहून निघाले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ते कऱ्हाड तालुक्यातील इंदोली फाटा येथे आले. त्यावेळी चालक नीलेश याने लघुशंकेसाठी कार महामार्गाकडेला थांबवली. बिल्डर श्रीनिवास व चालक नीलेश दोघेजण काही अंतरावर गेले असताना अचानक सहाजणांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात जखमी झालेले श्रीनिवास व नीलेश हे दोघेजण कारमध्ये काहीवेळ बसून राहिले. श्रीनिवास हे गंभीर जखमी असल्याने नीलेश त्यांना घेऊन तातडीने कोल्हापूरला गेला. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात श्रीनिवास यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर नीलेशवर प्राथमिक उपचार करून त्याला सोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उंब्रज पोलिसांनी कोल्हापूरला जाऊन श्रीनिवास यांची भेट घेतली. तसेच आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली. याबाबतचा गुन्हा उंब्रज पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)