शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पाचशे पोलीस वारीत; तरीही सातारा तयारीत- संयम जिंकला : अपुऱ्या बळावरही साताºयात ‘स्मार्ट पोलिसिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:57 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ठिकठिकाणी बंद, मोर्चा सुरू आहे त्यात मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी पंढरपूर बंदोबस्तात अडकले असताना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात झालेला हिंसाचार संयमाने हाताळला.

स्वप्निल शिंदे ।सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ठिकठिकाणी बंद, मोर्चा सुरू आहे. त्यात मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी पंढरपूर बंदोबस्तात अडकले असताना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात झालेला हिंसाचार संयमाने हाताळला. तसेच त्याचे लोण इतरत्र पसरले नाही. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सातारा जिल्हा पोलिसांचे कौतुक केले आहे.

दूध आंदोलन आणि पंढरपूर वारीसाठी शासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. सातारा पोलीस दलात सध्या २ हजार ९०० कर्मचारी करतात. त्यापैकी ५०० कर्मचारी सध्या पंढरपूर वारीच्या बंदोबस्तात आहेत. ते अजूनही साताºयात आले नव्हते. त्यात मंगळवारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. बुधवारी महाबळेश्वर, पाचगणी, शिरवळ, खंडाळा, कºहाड आदी ठिकाणी मोर्चा आणि बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताला होते. साताºयात अवघ्या ३०० कर्मचाºयांचा फौजफाटा होता. तर मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होेते.

शेकडोच्या संख्येत असलेल्या पोलिसांना हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले आक्रमक आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक पद्माकर घटवट, नारायण सारंगकर यांनी रणनिती आखून तणावजन्य परिस्थिती संयमाने हाताळली. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसह ५ स्टाईकिंग फोर्सच्या मदतीने महामार्ग परिसरात कॉम्बिंग आॅपरेशन करून दगडफेक करणाºया ८५ जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे अवघ्या २ तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर तणाव निवळून परिस्थिती पूर्ववत झाली.पवार, राजमानेंच्या रणनितीने नुकसान टळलेमराठा क्रांती समन्वय समितीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला असता महामार्गावर हिंसक कारवाई होण्याची शक्यता असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार व उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ एक पथक महामार्गावर रवाना केले.

जमावाने महामार्ग रोखल्यानंतर पोलिसांनी अजंठा चौक ते वाढेफाटा, कृष्णानगर ते जिल्हा परिषद परिसरात रस्त्यावर एकही खासगी वाहन राहणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे जमावाने दगडफेक केली, त्यात पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले. बाकीचे कोणतेच वाहन नसल्यामुळे मोठे नुकसान टळले.

टॅग्स :marathaमराठाStrikeसंपPoliceपोलिस