शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून शिरवडे-तासवडे दरम्यान कृष्णा नदी पुलावरुन मासेमारी, वाहतुकीस अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:09 IST

'रोजगार उपलब्ध नसल्याने दिवस दिवसभर मासे पकडतो. ते विकून मिळालेल्या पैशातून रोजी रोटी मिळते'

मसूर : कराड तालुक्यातील शिरवडे - तासवडे दरम्यान कृष्णा नदीवर झालेल्या नवीन उंच पुलावर धोकादायक पद्धतीने सध्या मासेमारी सुरू आहे. मासेमारी करणाऱ्यांच्या गळाला मासा लागेल का नाही माहीत नाही. पण ज्या पद्धतीने ही मासेमारी सुरू आहे, त्यामुळे त्यांचा जीव मात्र टांगणीला लागेल अशी भीती व्यक्त होत आहे.गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी शिरवडे तासवडे दरम्यान वाहणाऱ्या कृष्णा नदीवर माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने दळण वळण सुलभ व्हावे यासाठी उंच मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून सह्याद्री साखर कारखान्याकडून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणे सुलभ झाले आहे. शिरवडे-तासवडेसह परिसरातील अनेक गावांची दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण झाली आहे. तसेच महामार्गाला जोडणारा जवळचा मार्ग झाल्याने प्रवासी व वाहनधारकांना सोयीचा रस्ता उपलब्ध झाला आहे.अलीकडे या पुलाच्या संरक्षक कठड्यावर धोकादायक पद्धतीने उभे राहून मासे पकडण्यासाठी गळ टाकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गळ टाकताना किंवा मासा गळाला लागला की काय हे पाहण्यासाठी हे सर्वजण अरुंद कठड्यावर उभे राहून बघत असतात. त्यामुळे एखादे वेळेस या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच हे मासे पकडण्यासाठी थांबलेल्या लोकांच्या दुचाकी ही या कठड्याच्या कडेला अस्ताव्यस्तपणे लावलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या पुलावरून सध्या उसाच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर सह लहान-मोठी अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. यावेळी नेहमीच पुलावर गर्दी आढळून येते. अशावेळी वाहनांना क्रॉस करताना किंवा ओव्हरटेक करताना एखादी दुर्घटना किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलावरील धोकादायक पद्धतीने सुरू असलेली मासेमारी प्रशासनाने थांबवावी अशी मागणी या परिसरातील वाहनधारक व प्रवाशी वर्गातून होत आहे.

पुलावरून गळ टाकून पकडलेले मासे विकले तर दिवसाकाठी किरकोळ शंभर किंवा दोनशे रुपये मिळतात. मात्र कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने दिवस दिवसभर पुलावर थांबून मासे पकडतो व विकून मिळालेल्या पैशातून आम्हाला रोजी रोटी मिळते. - एक मासेमारी करणारा युवक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfishermanमच्छीमारTrafficवाहतूक कोंडी