शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला प्रथमच दिवाळीचे लाडू गोड!

By admin | Updated: October 21, 2014 23:39 IST

खंडाळ्यात ‘गजर’ : विरोधकांनी केली चकली; झालं ‘कडबोळं’

मुराद पटेल - शिरवळ -वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघातील खंडाळा तालुक्याती शिरवळ जिल्हापरिषद गटामध्ये मतदारांनी राष्ट्रवादीचा घड्याळाचा गजर वाजविला आहे. प्रमुख्याने शिरवळमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीने पक्ष स्थापनेनंतर प्रथमच विधानसभेत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.भौगोलीक दृष्ट्या मोठा व राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाई मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे मकरंद पाटील, काँग्रेसतर्फे मदन भोसले, शिवसेनेकडून डी. एम. बावळेकर तर प्रथमच पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली. दरम्यान राष्ट्रवादी शिवसेनेची उमेदवारी चित्र स्पष्ट झाले तरी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्थेचे वातावरण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जाणवत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी अवस्था झाली आहे. याचा परिणाम शिरवळ जिल्हा परिषद गटात शेवटपर्यंत जाणवला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वताची प्रचारयंत्रणा व नाराजांची नाराजगी दूर करीत एकजूटपणे आक्रमक प्रचार यंत्रणा राबविली. तर काँग्रेस, शिवसेना, भाजपामध्ये कार्यकर्त्यांची मने जुळवीताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. शिरवळ जिल्हापरिषद गटात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीने यंदाच्या निवडणुकीत गरुड झेप घेतली. यांदा मात्र काँग्रेसच्या मताधिक्यात घट होवून कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. पुरुषोत्तम जाधव यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले, तर डी. एम. बावळेकर यांना शिरवळ गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.राजकीय समीकरणे बदलणार?विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील यांना तब्बल दोन हजारांचे मताधिक्य एकट्या शिरवळमधून मिळाले आहे. काँग्रेसचे खंडाळा तालुकाध्यक्ष गुरुदेव बरदाडे यांच्या होमपिचवर काँग्रेसचे घटलेले मताधिक्य काँग्रेसला आत्मपरिक्षण करायला लावणारे आहे. तर शिवसेनेला लागलेली गळती थोपविण्याचे काम उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांना करावे लागणार आहे. एकूणच आगामी काळात शिरवळ गटातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत.