शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पहिला झाला.. दुसरा झाला.. आता तिसरा डोस कसला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 13:02 IST

Corona vaccine Virus Satara : कोरोना होऊ नये म्हणून शासनातर्फे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचे दोन डोस घेऊन देखील नागरिकांच्या मोबाईलवर डोस घेण्याबाबतचे संदेश येत असल्याने पहिला झाला.. दुसरा झाला.. आता तिसरा डोस कसला ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देपहिला झाला.. दुसरा झाला.. आता तिसरा डोस कसला? नागरिकांना जातायत संदेश; पाठवले जातात ओटीपी; लसीकरणाचा आग्रह

सागर गुजरसातारा : कोरोना होऊ नये म्हणून शासनातर्फे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचे दोन डोस घेऊन देखील नागरिकांच्या मोबाईलवर डोस घेण्याबाबतचे संदेश येत असल्याने पहिला झाला.. दुसरा झाला.. आता तिसरा डोस कसला ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.लसीकरणाच्या बाबतीमध्ये सावळागोंधळ सुरुवातीपासूनच सुरू होता, तो अजून देखील सुरूच आहे. ग्रामीण भागामध्ये लसीकरण मोहीम शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडते आहे; परंतु शहरांमध्ये मात्र लसीकरण केंद्रांवर पहाटे पासून बसणाऱ्या नागरिकांना लस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.दरम्यान, सातारा पालिकेचे माजी नियोजन सभापती रवींद्र झुटिंग यांना लसीकरणाच्या बाबतीतला एक वेगळाच अनुभव येत आहे. त्यांनी ६ मार्च २०२१ ला नोंद करून लसीचा पहिला डोस घेतला, त्यानंतर ४५ दिवसानंतर त्यांनी २१ एप्रिल रोजी नोंदणी करून दुसरा डोस घेतला. दोन्ही डोसचे प्रमाणपत्र देखील त्यांनी घेतले. मात्र पुन्हा २६ मे रोजी दुसरा डोस हा २९ मे रोजी असल्याचा संदेश आला. तसेच त्यांच्या मोबाईलवर ओटीपी देखील पाठवून देण्यात आला होता. 

 रविंद्र यांनी पहिले दोन्ही डोस घेतले असल्याने या संदेशाकडे दुर्लक्ष केले, परंतु पुन्हा एक जूनला त्यांना तसाच संदेश आला. या संदेशात देखील ओटीपी देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना प्रश्न पडला डोस घेतलेले असतानादेखील वेबसाईटवर नोंद केली असल्याने वारंवार संदेश पाठवले जात आहेत आणि त्यात ओटीपी देखील दिला जातोय, हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी या संदेशाकडे दुर्लक्ष केले.लोकांचा मोबाईल नंबर संबंधीत वेबसाईटकडे आहे. एखाद्या व्यक्तीने दोन्ही डोस घेतले असतील मात्र त्याचे प्रमाणपत्र घेतले नसेल तर असा मेसेज आल्यास लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते तसेच सध्याच्या परिस्थितीत लोकांचे चिंतेत देखील भर पडते. लोक लस घेण्यासाठी पुन्हा लसीकरण केंद्रावर जातील, किंवा हा ओटीपी शेअर झाला तर लोकांच्या बँकेतील पैशावर देखील डल्ला मारला जाऊ शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.ओटीपी देणं धोकादायक ठरेल...मोबाईलवर ओटीपी पाठवून फसवणुकीचे गुन्हे होत असतात. लसीकरणासाठी जी वेबसाईट दिली आहे, त्यांच्यामार्फत असे ओटीपी नागरिकांच्या मोबाईलवर पाठवले जात आहेत. दोन्ही डोस घेऊन देखील ओटीपी आला आणि असा ओटीपी चुकीच्या ठिकाणी वापरला गेला तर लोकांच्या आर्थिक नुकसान देखील होऊ शकते आणि हे धोकादायक आहे.

मी कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले. यासाठी रीतसर शासनाने दिलेल्या वेबसाईटवर नोंद केली होती. लसीकरणानंतर त्याचे प्रमाणपत्र देखील घेतले. मात्र अजूनही लस घेण्यासंदर्भाने संदेश येत आहेत. त्यामध्ये ओटीपी दिला जातोय, ही बाब शंकास्पद आहे.- रवींद्र उर्फ शैलेंद्र झुटिंग- भारतीमाजी नियोजन सभापती, सातारा.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर