शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 

By नितीन काळेल | Updated: October 9, 2024 20:39 IST

आठही मतदारसंघ लढवणार : साताऱ्यात ५८ उमेदवारांच्या मुलाखती पार.

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी सात मतदारसंघासाठी ५८ इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. तर वंचितचा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवारही माणमधून जाहीर झाला आहे. पक्षाने इम्तीयाज नदाफ यांना उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्यावतीने राज्यभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. बुधवारी शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्यातील सात मतदारसंघासाठी निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी ५८ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये सातारा मतदारसंघासाठी १३, वाई ७, कऱ्हाड उत्तर ९, कऱ्हाड दक्षिण ६, पाटण ५, फलटण १२, कोरेगाव मतदारसंघासाठी ६ जणांच्या मुलाखती झाल्या. वंचितकडून अनेक दिग्गजांनी उमेदवारी मागितली असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, महासचिव अरविंद आढाव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचितचे १० उमेदवार जाहीर...वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राज्यातील १० विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघाच्या उमेदवाराचा समावेश आहे. माणमध्ये इम्तीयाज जाफर नदाफ यांना उमेदवारी मिळाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही लवकरच जाहीर होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी