शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

By admin | Updated: December 16, 2014 23:35 IST

मुहूर्त मिळाला : स्मारकाच्या पूर्ततेच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलले--‘जीवा’ची बाजी... पण स्मारक कधी?

जगदीश कोष्टी - सातारा  -छत्रपती शिवरायांवरील हल्ला जीवावर उदार होऊन झेलणारे जीवा महाले यांचे स्मारक प्रशासकीय अन् लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे मागे पडले होते. दहा वर्षांनंतर सोमवार, दि. १६ रोजी तिसऱ्यांदा प्रतापगडाच्या पायथ्याला वाडा कुंभरोशी येथील सोळा गुंठे जागेचा प्रस्ताव महाबळेश्वर तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत प्रत्येक मावळ्याचे योगदान छत्रपती शिवरायांनी जाणले होते. मात्र, हिंदवी स्वराज्यासाठी लढलेल्या जीवा महाले यांच्या स्मारकाच्या बाबतीत दाखविलेल्या उदासिनतेमुळे इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात होती. पुढच्या पिढीला त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी वीर जीवा महाले यांचे स्मारक व्हावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी २००४ मध्येच स्मारक मंजूर केले होते. त्यानंतर जीवा महाले स्मारक समितीची स्थापना झाली. त्यामुळे काही दिवसांत स्मारक उभारेल असे वाटत होते. मात्र, त्यानंतर तब्बल आठ वर्षे समितीची बैठकच झाली नसल्याचा आरोप जीवा सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. हे स्मारक लवकरात लवकर व्हावे, यासाठी वेळोवेळी आंदोलनाचेही शस्त्र उपसले. गेल्या आठवड्यात पाचगणीतील सलून दुकाने बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला होता.स्मारकासाठी प्रथम प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला, तर त्यानंतर पुतळ्याच्या पश्चिम दिशेला दुसरी जागा सुचविली गेली होती. तरीही स्मारकाचा प्रश्न काही सुटला नाही. स्मारकासाठी आता प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली गेली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव महाबळेश्वर तहसील कार्यालयाने जिल्हधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. प्रस्तावाची प्रत मागविलीमहाबळेश्वर तहसील कार्यालयाने स्मारकाच्या जागेसंदर्भात नव्याने पाठविलेल्या जागेच्या प्रस्तावाची प्रत मिळावी, अशी मागणी जीवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.वीर जीवा महाले स्मारकासाठी वाडा कुंभरोशी येथील सोळा गुंठे जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यासंदर्भात लवकरच कार्यवाही सुरू होईल.- अतुल म्हेत्रेतहसीलदार