शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

अडीचशे जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 3, 2014 01:25 IST

तीव्र पडसाद

सातारा : सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे पोस्ट करण्याच्या प्रकारणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर गर्दी, मारामारी, दंगा करणे, चिथावणी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली पोलिसांनी जिल्ह्यातील सुमारे २५० जणांवर गुन्हा नोंद केला आहे. सातारा शहर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे ३५ जणांना अटक केलेली आहे. सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे पोस्ट करण्याच्या घटनेचे सातारा जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले होते. सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी विविध कलमांखाली आठ तक्रारी दाखल करून सुमारे १५० हून अधिक जणांवर गुन्हा नोंद केला आहे. यामधील सुमारे ३५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. त्यातील काहीजणांची जामिनावर सुटका झाली तर काहीना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तसेच यामधील १२ जणांना पुन्हा दुसर्‍या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात ६४ जणांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. विविध कलमांखाली संबंधितांवर हे गुन्हे नोंद झाले आहेत. फलटण तालुक्यात १२ जणांवर गुन्हा नोंद झाला असून, त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. उदयनराजे मित्र मंडळाकडून निवेदन सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी बदनामीचा धांदात खोटा, असत्य आणि अफवा पसरविणारा मजकूर प्रसिद्ध होत असल्याच्या निषेधार्थ उदयनराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उदयनराजे भोसले यांच्याविषयी दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातूून बदनामीचा धांदात खोटा मजकूर प्रसिद्ध होत आहे. एका प्रार्थनास्थळाचा फोटो सोशल मीडियावर टाकून चुकीचा संदेश पसरवला जात आहे. जो पूर्णत: निंदणीय आहे. अशा बदनामी करणार्‍या व खोडसाळ प्रवृत्तींचा सायबर क्राईम अन्वये गुन्हा नोंद करून तातडीने बंदोबस्त करावा, अशी आमची मागणी आहे.या निवेदनावर सतीश पवार, विजय पवार, संजय शिंदे, प्रशांत सावंत, संग्राम बर्गे, विजय बडेकर, सरपंच रवींद्र पाटेकर, चंद्रशेखर घोडके आदींच्या सह्या आहेत.