सातारा : तालुक्यातील एका गावात शिक्षिकेचा विनयभंग करुन तिच्या पतीला धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पती-पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नीता सपकाळ आणि प्रशांत सपकाळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिक्षिका असलेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सासूची चौकशी करण्यासाठी त्या नीता हिच्याकडे गेल्या असता, ‘तू कशाला येथे आलीस..?’, अशी विचारणा केली. यावर त्यांनी ‘मी सासूला घेऊन मुंबईला जाणार आहे’, असे सांगितले. मात्र, ‘मी माझ्या आईला कुठे पाठवणार नाही’, असे म्हणून नीता हिने तक्रारदार शिक्षिकेला शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी नीताचा पती प्रशांत याने ‘तुला सासू हवी का..?’, अशी विचारणा करतच शिक्षिकेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी शिक्षिकेच्या पतीलाही धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नीता सपकाळ आणि प्रशांत सपकाळ या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.