शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे अन् श्रीनिवास पाटील यांच्यातच लढत-: दोन माजी खासदारांमध्येच रंगणार सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 23:20 IST

लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघातून, तर सत्यजित पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचा पत्ता ओपन -आता राष्ट्रवादीही तोडीस तोड शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याविरुद्ध माजी खासदार उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी-काँगे्रस व मित्र पक्षांच्या आघाडीतर्फे श्रीनिवास पाटील दि. ३ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे नियोजन राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या आघाडीतर्फे करण्यात आले होते. ही उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या; परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी क-हाड दक्षिण मतदारसंघात विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना मंगळवारी सकाळी फोन करून श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा, अशी सूचना केली आहे. ३ आॅक्टोबर रोजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघातून, तर सत्यजित पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

दरम्यान, ४ आॅक्टोबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पवार ४ तारखेला प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शशिकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्जही ४ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत भरणार आहेत.

कोण आहेत श्रीनिवास पाटील?श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे महाविद्यालयीन काळातील जिवलग मित्र आहेत. या दोघांचे शिक्षण पुण्यात झाले. श्रीनिवास पाटील पुढे सनदी अधिकारी झाले. पवारांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या पाटील यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कºहाड मतदारसंघातून पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. तसेच २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही पाटील सलग दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. नंतरच्या पाच वर्षांच्या काळात श्रीनिवास पाटील यांना सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आता वयाच्या ७९ व्या वर्षी ते लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. 

पक्षाध्यक्षांसह प्रदेशाध्यक्ष लावणार हजेरीश्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे दोघे उपस्थित राहणार आहेत. पाटील यांनी दि. १ आॅक्टोबर रोजी वाळवा-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने उदयनराजेंचा अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. आता राष्ट्रवादीही तोडीस तोड शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक