शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

corona cases in Satara : मेघलदरेवाडीतील एका वस्तीवर पन्नास कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 19:59 IST

corona cases in Satara : एका बाजूला जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे आशादायक चित्र असतानाच खटाव तालुक्यातील काही गावांत धोक्याची घंटा वाजत आहे. जेमतेम आठशे लोकसंख्या असलेल्या मेघलदरेवाडीत (रामोशीवाडी ) काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आरोग्य तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकाच वस्तीवर पन्नासहून बाधित सापडल्याने आरोग्य प्रशासनाबरोबरच आजूबाजूची गावंही हादरून गेली.

ठळक मुद्देमेघलदरेवाडीतील एका वस्तीवर पन्नास कोरोना बाधित आरोग्य विभाग हादरला : आरोग्य तपासणी मोहीमेत धक्कादायक माहिती उघडकीस

पुसेगाव /सातारा : एका बाजूला जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे आशादायक चित्र असतानाच खटाव तालुक्यातील काही गावांत धोक्याची घंटा वाजत आहे. जेमतेम आठशे लोकसंख्या असलेल्या मेघलदरेवाडीत (रामोशीवाडी ) काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आरोग्य तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकाच वस्तीवर पन्नासहून बाधित सापडल्याने आरोग्य प्रशासनाबरोबरच आजूबाजूची गावंही हादरून गेली.त्यानंतर येथील प्रत्येक वाड्यावस्त्यांवर तपासणी शिबीर आयोजन करूनही नागरिक तपासणी करायला पुढे येत नसल्याने प्रशासनाने जाखणगाव येथील चौकात पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेत येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी करण्याचा नविन फंडा सुरू केला आहे.पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त शहरांपुरता मर्यादीत होता. मात्र दुसऱ्यात लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अधिक वाढले आहे. यातून ग्रामिण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कामगिरीवर चारीबाजूने टिकांचा भडीमार होताना दिसत आहे.

खटावच्या आरोग्य केंद्राच्या अख्त्यारीत असणाऱ्या गावांतील नागरिकांना दहा, दहा किलोमीटरचा टेस्टसाठी प्रवास करायला लागू नये म्हणून येथील थेट गाव, वस्त्या व वाड्यावर पोहचून शिबिराचे आयोजन वरचेवर करण्यात येत आहे. मात्र येथील नागरिक या चाचण्या सहजासहजी करून घेण्यास तयार होत नसल्याचे दिसत आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी फडतरे, आरोग्य सेवक चंद्रशेखर सावळकर, अंगणवाडी सेविका सुनिता काटकर, आरोग्य सेविका माया पवार, संकेत पवार उपस्थित होते.नागरिकांच्या सहकार्याअभावी प्रशासन हतबलरामोशीवाडीत मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागल्याने जवळपासच्या वाड्यावस्त्यांत तपासणी शिबिर भरवण्यात आले. त्यापैकी गादेवाडी येथे शिबीर भरवून एकही नागरिक तपासणीला फिरकला नसल्याने प्रशासनाला रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. त्यामुळे आता नाईलाजास्तव पोलिसांचा धाक दाखवून जाखणगाव चौकात वरचेवर भेटेल त्या प्रत्येक प्रवाशांची तपासणीचे काम हाती घेण्यात आले, अशी माहिती खटाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. पराग रणदिवे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर