शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

महिला डॉक्टरची सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक,कऱ्हाडात दोघांवर गुन्हा

By दीपक शिंदे | Updated: December 20, 2024 22:25 IST

Satara News: कस्टम (सीमाशुल्क) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कऱ्हाडातील महिला डॉक्टरची तब्बल सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली.

कऱ्हाड - कस्टम (सीमाशुल्क) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कऱ्हाडातील महिला डॉक्टरची तब्बल सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली. दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे सोळा पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आली.

याबाबत डॉ. प्रणोती रुपेश जडगे यांनी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडात राहणाऱ्या प्रणोती जडगे या कृष्णा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. २० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला. संबंधिताने आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूममधून सीमाशुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचे सांगून, तुमच्या नावाचे दिल्ली ते मलेशियासाठीचे पार्सल विमानतळावर अडवून ठेवले आहे. त्यामध्ये १६ पासपोर्ट, ५८ एटीएम कार्ड आणि १४० ग्रॅम ड्रग्ज असून, हा गुन्हा ज्या पोलिस ठाण्याला नोंदवला, त्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला, असे त्या मिश्रा नामक व्यक्तीने सांगितले. तसेच त्याने वसंतकुंज पोलिस ठाण्यातील सुनील कुमार या व्यक्तीशी फोन जोडून दिला. सुनील कुमार याने डॉ. प्रणोती जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयाने तुमची सर्व बँक खाती गोठविण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले. तसेच दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉ. प्रणोती जडगे यांच्या व्हॉट्सॲपला पाठवून दिली.

या सर्व प्रकारांमुळे डॉ. जडगे घाबरल्या. त्यानंतर सुनील कुमार नामक व्यक्तीने त्यांना व्हिडीओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचे असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करा, असे सांगितले. डॉ. जडगे यांनी त्यांच्या बँक खात्यातील १६ लाख २५ हजार १०० रुपये संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाइन हस्तांतरित केले. मात्र, त्यानंतर सुनील कुमार व सुमित मिश्रा या दोघांचेही फोन लागले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉ. प्रणोती जडगे यांनी शुक्रवारी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. सहायक फौजदार सुभाष फडतरे तपास करीत आहेत. 

‘त्या’ मेसेजनंतर संशयितांचे फोन बंदडॉ. प्रणोती जडगे यांनी रक्कम पाठविल्यानंतर प्रत्येक तासाला तुम्ही आम्हाला ‘आयएमसेफ सर’ असा मेसेज करा, असे संशयितांनी सांगितले होते. त्यामुळे डॉ. प्रणोती जडगे यांनी संबंधितांना तसे मेसेज केले. मात्र, दुसऱ्या दिवशी सायंकाळी अचानक ‘सॉरी मॅडम, तुमचे पैसे गोठवले गेले आहेत आणि आम्ही काहीही करू शकत नाही,’ असा मेसेज संशयितांकडून डॉ. जडगे यांना प्राप्त झाला. त्यानंतर संशयितांचे फोन बंद झाल्याचे डॉ. जडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcyber crimeसायबर क्राइम