शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! आईच्या निधनानंतर चिमुकलीने घेतली कुटुंबाची जबाबदारी, पण मद्यपी वडिलांच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:24 IST

वडिलांच्या त्रासाला कंटाळली. त्यामुळे तिने यातून सुटका व्हावी म्हणून विहिरीत उडी टाकून आपले आयुष्य संपविले.

सातारा : आईच्या निधनानंतर लहान वयातच १५ वर्षांच्या मुलीने कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेतली. मात्र, वडील सतत दारू पिऊन तरर्र असल्याने मुलगी वडिलांच्या त्रासाला कंटाळली. त्यामुळे तिने यातून सुटका व्हावी म्हणून विहिरीत उडी टाकून आपले आयुष्य संपविले. मानसी संतोष डाडर (वय १५, मूळ रा. नागलवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर, सध्या रा. आंबेवाडी, ता. सातारा) असे या मृत मुलीचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलीय.याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मानसीचे वडील संतोष डाडर हे ऊसतोड मजूर असून, आंबेवाडी येथील शेतामध्ये पाल टाकून वास्तव्य करत आहेत. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना मानसी आणि १३ वर्षांचा मुलगा आहे. पत्नीचे निधन झाल्यानंतर चिमुकल्या मानसीने वडील आणि भावाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली. या दोघांना जेवण करून घालणे, स्वत: ऊसतोडीला जाणे, असा तिचा दिनक्रम असायचा.मात्र, दररोज तिचे वडील संतोष डाडर हे घरामध्ये दारू पिऊन यायचे. त्यामुळे तिला ते सहन होत नव्हतं. त्यातच आर्थिक ओढाताण व्हायची. या साऱ्या प्रकाराला ती कंटाळली होती. यातून आपली सुटका व्हावी म्हणून तिने टोकाचा निर्णय घेतला. आंबेवाडी येथील मसवटा नावाच्या शिवारातील विहिरीमध्ये तिने दुपारच्या सुमारास उडी टाकून आत्महत्या केली.हा प्रकार समोर आल्यानंतर याची माहिती बोरगाव पोलिसांना देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

संसारोपयोगी साहित्य ठेवून वडील गेले गावी..एकुलत्या एक मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वडील संतोष डाडर यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे याची जबाबदारी ते ज्या कारखान्याकडे काम करत होते. त्या कारखान्याने खर्चाची जबाबदारी पेलली. त्यांच्या मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकने त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला. जाताना त्यांनी संसारोपयोगी साहित्य त्यांच्या पालवजा घरामध्ये ठेवले आहे. आता ते परत इकडे येतील की नाही, याची शाश्वती नाही, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर