शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

पित्याचा अनर्थ तरीही माणुसकीचा ‘अर्थ’!

By admin | Updated: December 8, 2015 00:34 IST

बोरगावातील अथर्वला मदत : व्हॉटस्अ‍ॅप गु्रप, सामाजिक संस्थाकडून हात; दीड लाख रुपये सुपुर्द

पांडुरंग भिलारे-- वाई बोरगाव, ता़ वाई येथे घरगुती वादातून पत्नीचा निघृण खून करून मुलास जखमी केले व स्वत: ही जीवन यात्रा संपविली. या घटनेने फक्त वाडकर कुटुंबच नव्हे तर सर्व समाजमनाला हेलावून सोडलं गेलं. जखमी असणाऱ्या अथर्ववर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्याच्या व कुटुंबाच्या मदतीला व्हॉटसअ‍ॅप ग्रुप आणि सामाजिक संस्था धावल्या. आवाहनानंतर एक लाख ६० हजारांची रक्कम जमा झाली. त्यातच आमदार मकरंद पाटील यांनीही दोन्ही मुलांची भविष्यातील जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शविली आहे. बोरगाव येथील विजय वाडकर व त्याची पत्नी सारिका हे आपल्या मुलांसह कोपरखैराणे (नवी मुंबई) येथे एक वर्षापूर्वी राहण्यासाठी गेले होते़ पत्नी सारिका ही एका खासगी कंपनीत कामाला जात होती़ ही बाब विजयला आवडत नसल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.मुलगा अथर्व याला गावी राहण्यास आवडत होते़ दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक वादावादी विकोपाला गेली. त्यातूनच गावी बोरगावला विजयने पत्नी सारिकाचा खून केला, मुलावर हल्ला केला. त्यानंतर स्वत:ही गळा चिरून आत्महत्या केली. जखमी अथर्ववर सध्या वाई येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर वाईचा पश्चिम भाग हादरून गेला होता. तालुक्यात खळबळ माजली होती.वाडकर कुटुंबात विजय हा एकमेव कमवणारा होता. वडिलांचाही मृत्यू झाला आहे. आता या कुटुंबात आठवीमध्ये शिकणारी श्रृतिका, वयोवृध्द आजी व जखमी अथर्व असे कुटुंब राहिले आहे. अशा या कुटुंबापुढे एकाएकी नियतीचा दुर्दैवी अंधार पसरला़ अशा या दु:खाच्या प्रसंगी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधूनही सर्वत्र या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली़ मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत वाईच्या पश्चिम भागातून विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढे आल्या. त्यांनी आघात झालेल्या या कुटुंबाला माणूसकीचा हात दिला़ व्हॉटस्अ‍ॅप गु्रपमध्ये काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही वयगावकर, पंचक्रोशी ग्रुप, आपली माणसं, सामाजिक संस्थामध्ये जन्नीदेवी कला व क्रीडा मंडळ दह्याट, मावळा प्रतिष्ठान, रोटरी क्लब वाई, बोरगावचे न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव ग्रामस्थ मंडळ, पश्चिम भागातील प्राथमिक शिक्षक, तसेच पश्चिम भागातील मुंबईकर नागरिकांनी, नोकरदारांनी वैयक्तिक मदतीचा हात पुढे केला़. जखमी अथर्वच्या उपचारासाठी व भविष्यासाठी एक लाख साठ हजारांची रक्कम जमा केली़ यासाठी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमाचा चांगला उपयोग झाला़ दरम्यान जखमी अथर्वला पाहण्यासाठी आलेल्या आमदार मकरंद पाटील यांनी दोन्ही मुलांची भविष्यातील महत्त्वपूर्ण जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शविली आहे. अथर्व उपचार घेत असलेल्या गितांजली हॉस्पिटलचे डॉ. जयघोष कद्दू यांनी सांगितले की ‘अथर्वची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे. त्याला हॉस्पिटलच्या बिलामध्ये आर्थिक दिलासा देण्यात येईल.’ सोशल मीडियाचे सकारात्मक रूप...सध्या अनेकांकडून सोशल मीडियाचा दुरूपयोग होत आहे. विविध गैरप्रकार घडतात. त्यामुळे समाजापुढे सोशल मीडियाचे विद्रुप रूप समोर आले होते़ सोशल मीडियाची दुसरी बाजू पाहिली तर काही लोक संघटीत होऊन विधायक कामे करत असल्याचे ही दिसते. याची प्रचिती देत अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मदत गोळा केली जात आहे. हे सोशल मीडियाचे समारात्मक रूपच म्हणावे लागेल़