सागर गुजर--सातारा सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि.१५) तब्बल ३ लाख १0 हजार ८५१ मतदार आपले मतदानाचे कर्तव्य बजावणार आहेत. जावळी तालुक्यातील रेवंडी, खिरखिंडी व तारगाव या शिवसागर जलाशयाच्या पलिकडील जावळी तालुक्यातील दुर्गम मतदान केंद्राकडे बोटीतून मशिनसह कर्मचारी गेले.या निवडणुकीसाठी ९ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतपेटीबंद होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण व रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ४२६ पोलिंग कर्मचाऱ्यांना सोमवारी येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात मतदानाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. मंगळवारी सकाळी येथील शाहू स्टेडिअममध्ये मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात ४८ झोनल आॅफिसर ४८ राखीव मशिनसह मतदान केंद्रांकडे रवाना झाले. याव्यतिरिक्त १३ मंडलाधिकाऱ्यांकडेही मशिन तसेच मतदानाच्या अनुषंगाने इतर सर्व साहित्य देण्यात आलेले आहे. यापैकी १५२ मशिन जावळी तालुक्यात तर उर्वरित २७४ मशिन सातारा तालुक्यातील मतदान केंद्रांवर ठेवण्यात येणार आहेत. सातारा शहरात ८२ केंद्रांवर प्रत्येकी एक मशिन असणार आहे.रेवंडी, खिरखिंडी, तारगाव व वेळे या मतदान केंद्रांवर मोबाईल तसेच इतर टेलिफोन यंत्रणा बंद राहणार असल्याने मतदान कर्मचाऱ्यांकडे वायरलेस यंत्रणा देण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर १ पोलीस कर्मचारी व १ होमगार्ड असणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये ९ उमेदवारांचे प्रत्येकी एक पोलिंग एजंट नेमण्यात आले आहेत. या निवडणुकीत ४ हजार ८२७ मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ६ नंतर साताऱ्यातील शाहू स्टेडिअममध्ये मतदान यंत्रे आणण्यात येतील. येथेच स्ट्राँग रुम तयार करण्यात आली असून कडक पोलीस बंदोबस्तात दि. १९ ेपर्यंत या मशिन ठेवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)सातारा-जावळी मतदारसंघ४एकूण मतदार ३,१0,८५१४पुरुष १,५७,00१४महिला १,५३,८५0४मतदान केंद्रे ४२६३३३ मतदान केंद्रावर शोधणार ‘उत्तर’प्रशासकीय यंत्रणा सज्ज : अठराशे कर्मचाऱ्यांची फौज मतदार संघात, एसटीसह जीपची सोयकऱ्हाड उत्तर तालुका४एकूण मतदार २,७४,५३७४पुरुष १,४०,९८१४महिला १,३३,५५६४मतदान केंद्रे ३३३दुर्गम भागातही पोहोचली मतदान यंत्रणा!पाटण विधानसभा : निवडणूक अधिकाऱ्यांचे कसब पणालाडिचोली ग्रामस्थांसाठी कोयनानगरला मतदानकोयना धरणा पलीकडील डिचोली हे अभयारण्यातील मतदान केंद्र असून त्याठिकाणी जाण्यासाठी लाँचचा वापर करावा लागत होता. तेथील काही कुटुंबांचे पुनर्वसन इतर जिल्ह्यात झाले आहे. तरीही डिचोली गावातील ४७१ मतदारांना मतदानासाठी कोयनानगर येथे यावे लागणार आहे. पाटण तालुक्यातील राममळा, पांढरेपाणी, म्हारवंड, हुंबरणे हे चार मतदान केंद्रे दूरध्वनी व मोबाईल संपर्कहीन आहेत. त्याठिकाणी बिनतारी संदेशवहन यंत्रणा ठेवण्यात येणार आहे.- संजीव जाधव,निवडणूक निर्णय अधिकारी.एकही मतदान केंद्र संवेदनशील नाहीफलटण मतदार संघ : १४ उमेदवार रिंगणातफलटण मतदारसंघएकूण मतदार ३,०४,६८६पुरुष १,५८,६२५महिला १,४६,५५१मतदान केंद्रे ३३८
तीन गावांच्या मतदानाला बोटीचे भाग्य!
By admin | Updated: October 14, 2014 23:21 IST