शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे गावासाठीही उपोषण !

By admin | Updated: November 19, 2014 23:27 IST

तरुणांचाही सहभाग : वीज कंपनीने मागण्या केल्या मान्य

वरकुटे मलवडी : गावातील अडीअडीचणी, समस्या सोडवायच्या असतील. संबंधितांकडे काही मागण्या करायच्या असतील, तर गावातील गटातटाने मतभेद न ठेवता एकत्र यायचे असते. विकासासाठी असे पाऊल आवश्यक असते. तरच गावाचा विकास होतो. पण , वरकुटे मलवडी येथील ग्रामपंचायतीचा कर्मचारी व काही तरुणांनी वाढीव बिलांच्या विरोधात आणि इतर काही मागण्यांबाबत आंदोलन केले आणि वीज कंपनीला त्यांच्या मागण्या मान्यही कराव्या लागल्या.वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाबासाहेब मंडले यांनी वाढीव वीज बिलास कंटाळून गावातील काही तरुणांसमवेत दहिवडी, ता. माण येथील वीजवितरण कंपनीच्या दारातच उपोषण सुरू केले होते. गावात कायमस्वरूपी वायरमन मिळावा, बिले वाढून येणार नाहीत याची खबरदार घ्यावी, वीजबिले कमी करण्यासाठी दहिवडीला अनेक हेलपाटे मारावे लागतात ते थांबवावेत, आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेण्यास लावले. त्यांनी कायमस्वरूपी वायरमन देणे, वीजबिल कमी करणे मागण्या मान्य केल्या आहेत. यावेळी किरण जाधव, नवनाथ मिसाळ, पवन बनसोडे, दत्ता चव्हाण, बंडू मंडले, भलेराव खरात, स्कायलाईन दूध डेअरीचे सुभाष जगताप, सुमन आटपाडकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)खरे काम कोणाचे...वरकुटे मलवडी हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातीलही अनेक राजकीय पदे या गावात आहेत. मात्र, गटातटामुळे गावाचा विकास हा झालेला नाही, याची जाहीर कबुली ग्रामस्थ देत आहेत. मागील काही वर्षांपासूून आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर नाही. हा दवाखानाही सोसायटीच्या गोदामात आहे. तसेच तलाठी कार्यालय चक्क पशुवैद्यकीय दवाखान्याच्या एका खोलीत आहे. ग्रामपंचायत कार्यालयही भाड्याच्या खोलीत आहे. गावात वायरमन मुक्कामी नसतात. याबद्दल अनेकवेळा ग्रामसभेतही तक्रारी झाल्या होत्या. पण, त्याकडे लक्ष दिले नाही.