शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वन मजुरांचे प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण

By प्रगती पाटील | Updated: December 4, 2023 17:42 IST

सातारा : महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयात फेर बदल करून सुधारित शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी ...

सातारा : महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयात फेर बदल करून सुधारित शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी तसेच वनमजुरांना शासन सेवेत कायम करण्यासाठी मंत्रालयीन दालनातील फाईल मंजुरी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वनमजूर वन कामगार वनपाल आणि जनरल युनियन यांच्यावतीने उपवनसंरक्षक कार्यालय समोर युनियन अध्यक्ष रामचंद्र भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.याबाबत उपवन संरक्षक कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वन विभागात १९८९ ते २०२३ या कालावधीत कार्यरत असणाऱ्या बऱ्याचशा रोजंदारी वनमजुरांची माहिती कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येत नाही. शासनाच्या चुकीच्या घटनाबाह्य शासन निर्णयामुळे वनमजुरांची माहिती शासनाला संबंधित कार्यालयामार्फत चुकीच्या पद्धतीने सादर केली जाते. त्यामुळे अनेक वनमजुरांवर अन्याय आजही सुरूच आहे. वर्षातून दोन ते तीन वेळा मिळणाऱ्या तुटपुंजा पगारावर शासन सेवेत कायम होण्याच्या अपेक्षित वयाच्या अटी निघून गेल्या तरी मजूर काम करत आहेत.

दरम्यान वन विभागात हंगामी कामासाठी रोजंदारी वनमजुरांची आवश्यकता असल्यास हंगामी कामाशिवाय इतर कोणत्याही कामावर बारमाही मजूर घेण्यात यावेत. हंगामी कामासाठी घ्यावयाच्या मजुरांच्या सेवा कोणत्याही परिस्थितीत तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी लागू करण्यात येऊ नये असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन