शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

कऱ्हाड पालिकेची वृक्षगणना कागदावरच!

By admin | Updated: May 18, 2016 00:08 IST

चार वर्षांपासून नोंदच नाही : वृक्षसंवर्धन प्राधिकरण समितीच्या नुसत्या बैठकाच; शहरातील वृक्षतोडीला पर्यावरण संघटनांचा विरोध

कऱ्हाड : शहरातील वृक्षांची गणना पालिकेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नाही. वृक्षसंवर्धन प्राधिकरण समितीच्या नुसत्या बैठकाच घेण्याचे काम केले जात आहे. वृक्षगणना फक्त कागदावरच केली जात असल्याने वृक्ष संवर्धनाकडे पालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. दुसरीकडे रस्ता रुंदीकरणामध्ये २५० वृक्षांची तोड करण्यात येणार असल्याने यास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.पालिकेकडून शहरातील वृक्षांची गणना केली जात नसल्याचे पाहता व शहरात नक्की किती व कोणत्या जातीची वृक्षे आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी २०११-१२ मध्ये एन्व्हायरो नेचर फे्रंडस क्लबच्या वतीने वृक्षगणना करण्यात आली. त्यावेळी शहरात २१ हजार २७६ झाडे असल्याचा अहवाल क्लबच्या वतीने तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतर आजतागायत पालिकेकडून शहरातील वृक्षगणनेबाबत विचार करण्यात आला नाही. पाच वर्षांपूर्वी एन्व्हायरो नेचर फे्रंडस क्लबच्या वतीने वृक्षगणना करण्यात आली. त्या अहवालात शहरात महत्त्वाच्या दुर्मीळ व औषधी जातीची वृक्षे आढळली असल्याची माहिती क्लबच्या वतीने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पालिकेकडून वृक्षांची निगा राखण्याबाबत कोणतेच लक्ष देण्यात आले नाही.पाच वर्षांनंतर मध्यंतरी वसुंधरा दिनादिवशी पालिकेच्या वतीने कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या रुंदीकरणात येणारी सुमारे २५० वृक्षांचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत वृक्ष संवर्धन प्राधिकरण समितीच्या वतीने महत्त्वाचे निर्णय ही घेण्यात येणार होते. मात्र, यास एक महिना उलटून गेला असला तरी कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. किंवा वृक्षगणना व सर्व्हे केलेला नाही. सध्या कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल या मार्गावर रस्ता रुंदीकरण केले जाणार असून, रस्त्यामध्ये येणाऱ्या २५० वृक्षांवर पालिका कुऱ्हाड पडणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने शहरातील दत्तचौक ते कृष्णानाका दरम्यानच्या रस्त्याची मोजणी देखील करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शहरात वृक्षसंवर्धन करण्यासाठी पालिकेकडून कोणतेचे उपक्रम राबवले गेलेले नाही. याउलट अनेक ठिकाणी वृक्षतोडीच केल्या असल्याचे पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तर वृक्षारोपणासाठी एकाही लोकप्रतिनिधीकडून पुढाकार घेतला जात नसल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरात अगोदरच वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत चालली असल्याने दुर्मीळ व औषधी वनस्पती लोप पावत चालल्या आहेत. अशा वृक्षांचे जतन करणे, त्यांची लागवड करण्याऐवजी त्याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. वृक्षसंवर्धनाबाबत पालिकेने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)एन्व्हायरो नेचर क्लबकडून वृक्षगणनाएन्व्हायरो फे्रंडस नेचर क्लब या संस्थेच्या वतीने २०११-१२ रोजी शहरात वृक्षगणना करण्यात आली होती. त्यावेळी शहरात २१ हजार २७६ वृक्ष असल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट केले होते. पालिकेकडूनही त्यावेळी वृक्षगणना करण्यात आली होती. मात्र, चुकीच्या पद्धतीने पालिकेने वृक्षगणना केली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आजतागायत पालिकेकडून शहरात वृक्षगणना करण्यात आलेली नाही. ५दर दहा वर्षांतून एकदा वृक्षगणना करावी असा नियम आहे. मात्र, शहरातील वृक्षांची संख्या पाहता ती पाच वर्षांतून एकदा केली जावी. संबंधित वृक्षगणना करणाऱ्या ठेकेदाराने वृक्षसंगोपण हे आपल्या मुलांसारखे करावे. जेणेकरून वृक्षांची वाढ योग्य प्रकारे होईल.- प्रकाश खोचीकर, उपाध्यक्ष, एन्व्हायरो नेचर फे्रन्डस क्लब, कऱ्हाड