परळी : ‘शेतकऱ्यांच्या पीक वाढीसाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन विविध योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणत असते, अशा योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे आधुनिकीकरण अंगीकारून उत्पन वाढविले पाहिजे,’ असे आवाहन प्रातांधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले.
सोनवडी व मौजे गजवडी गावामध्ये ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतावर जाऊन शेतकरी संतोष कारंडे यांना ई-पीक पाहणीबाबत त्यांच्या मोबाइलवर पीक पाहणी अपलोड केले आणि इतर सर्व शेतकऱ्यांनी हा ॲप डाऊनलोड करून घ्यावा आणि या पद्धतीने आपली पीक पाहणी करावी, असे शेतकऱ्यांना आवाहनही केले. यावेळी आंबवडे मंडळ अधिकारी अनिल जाधव, तलाठी व कोतवाल रामदास विभुते आणि सोनवडी सरपंच वंदना कारंडे, उपसरपंच महेश कदम, ग्रामपंचायत सदस्य दिनकर मनवे, पोलीसपाटील संध्या कारंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.