शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या आंदोलनाला बैलजोडी होणार साक्षी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:24 IST

विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सोमवार, दि. १६ रोजी सातारा येथे होणाऱ्या आंदोलनास बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कऱ्हाड येथे केला.

ठळक मुद्देबैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्याची कऱ्हाड येथे नियोजन बैठक बैलगाडी शर्यत बचाव समितीचा निर्णयआंदोलनास राज्यभरातून बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी होणार मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार

कऱ्हाड , दि. १४ : विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सोमवार, दि. १६ रोजी सातारा येथे होणाऱ्या आंदोलनास बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कऱ्हाड येथे केला.

सातारा येथे सोमवारी (दि. १६) रोजी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची कऱ्हाड येथे शनिवारी बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे सदस्य धनाजी शिंदे, पै. आनंदराव मोहिते, उदय पाटील, नाथाजी गरुड, पोपट गायकवाड, पै. रफिक इनामदार, विवेक पाटील आदींसह कऱ्हाड तालुक्यातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी धनाजी शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतींसदर्भांत मोठे बेमुदत आंदोलन होणार आहे. यास हजारो बैलगाडी चालक-मालक आपल्या बैलांसह उपस्थित राहणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातारा-सांगली जिल्ह्यांसह राज्यभरातून बैलगाडी चालक-मालक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

हे आंदोलन घरचे असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे सुरूच ठेवण्यात येणार आहे. अगदी दिवाळी आंदोलनस्थळी करावी लागली तरी चालेल. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासंदर्भात पुढाकार घेतला जात आहे. मात्र, प्राणीमित्र याला विरोध करण्याचे काम करीत आहेत. तालुक्यातील दोनशेहून अधिक बैलगाड्या चालक-मालक हे आपल्या बैलांसह यामध्ये सहभागी होतील. चार वर्षे झाली शर्यतींसाठी लढत आहोत. आता कोणत्याही परिस्थिती मागे हटणार नाही. जोपर्यंत प्राणीमित्र संघटनेवर बंदी घातली जात नाही. आणि शर्यती सुरू केल्या जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे.

सातारा येथे होणाऱ्या बेमुदत आंदोलनात कऱ्हाड तालुक्यातील हजारो बैलगाडी चालक-मालक व शेतकऱ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आवश्यक आहे. सर्वत्र जोरदार तयारी करून मतदान केल्यानंतर लगेच या आंदोलनासाठी सातारा येथे एकत्रित यावे, असे आवाहन पै. आनंदराव मोहिते यांनी केले.

टॅग्स :Chakka jamचक्काजामFarmerशेतकरी